Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:41 PM2021-10-08T12:41:31+5:302021-10-08T12:42:20+5:30

Mumbai cruise drug case: आर्यनच्या अटकेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून बॉलिवूडमधून  (bollywood) संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Mumbai rave party case: 'Shameful political ploy'; Raveena Tandon's fire | Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या बॉलिवूडमध्ये शाहरुखला पाठिंबा देणारे आणि टीका करणारे असे दोन गट पडले आहेत.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रुझवर ड्रग्स पार्टी (mumbai cruise drug case) केल्याप्रकरणी एनसीबीने (NCB) अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) लेकाला आर्यन खानला  (aryan khan) ताब्यात घेतलं.  त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये पार्टीतील सत्य समोर आल्यानंतर एनसीबीने आर्यनला अटक केली. आर्यनच्या अटकेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून बॉलिवूडमधून  (bollywood) संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्येच काही सेलिब्रिटींनी आर्यनला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी मात्र, आर्यन आणि शाहरुखवर टीकेची झोड उठवली आहे. यामध्येच अभिनेत्री रविना टंडनने (raveena tandon) आर्यनला पाठिंबा दिला असून त्याल्या झालेल्या अटकेला लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

रविनाने नुकतंच एक ट्विट केलं असून यामध्ये तिने ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. सोबतच एका किशोरवयीन मुलाच्या आयुष्याचा खेळ मांडल्याचं म्हणत तिने संताप व्यक्त केला आहे. सध्या रविनाच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा?

क्रूझ ड्रग्स पार्टी: प्रत्येक व्यक्तीकडून स्वीकारण्यात आलेलं तब्बल इतकं शुल्क

"लाजिरवाणा राजकीय डाव सुरु आहे. या लोकांनी एका तरुण मुलाच्या आयुष्याचा आणि भविष्याचा खेळ मांडून ठेवला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट", असं ट्विट रविनाने केलं आहे.

दरम्यान, रविनाच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तिला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. सध्या बॉलिवूडमध्ये शाहरुखला पाठिंबा देणारे आणि टीका करणारे असे दोन गट पडले आहेत. यात हृतिक रोशन, सुझान खान, सलमान खान अशा अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे.
 

Web Title: Mumbai rave party case: 'Shameful political ploy'; Raveena Tandon's fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.