ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 03:51 PM2020-09-17T15:51:17+5:302020-09-17T15:56:16+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी एनसीबीची टीम कसून करते आहे.

Narcotics bureau raid in mumbai rhea chakraborty case drug connection sushant case | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी NCBचे छापे, लवकरच होऊ शकतो मोठा खुलासा

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी एनसीबीची टीम करते आहे. एनसीबीने 17 (सप्टेंबर) गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्स कनेक्शनच्या प्रकरणात तुरुंगात आहे. आज तिच्याशी संबंधीत काही लोक आणि 
ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना आशा आहे की या छापामुळे मोठे यश मिळेल, जे या केससाठी अत्यंत महत्वाचे आहे.


सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ सोडवताना ड्रग्जचे कनेक्शन समोर आले होते. ज्यानंतर एनसीबीने चौकशीचा फास आवळला आणि अनेक ड्रग्स पेडलरना अटक केली. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीसह एक डझन लोकांना एनसीबीने यासंपूर्ण प्रकरणात अटक केली आहे. आता चौकशीच्या आधारे ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत, तशी एनसीबी आपली चौकशी पुढे नेते आहे.  सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये एनसीबीला हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत.


फार्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?
 ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर एनसीबी सुशांतच्या पवना डॅमजवळ असलेल्या फार्महाऊसची तपासणी करायला गेली होती. रिपोर्टनुसार इथल्या एका बोट चालवणाऱ्या व्यक्तीने एनसीबीच्या टीमला सांगितले की, रिया आणि साराला त्याने अनेक वेळा सुशांत सोबत बघितले आहे. त्याच बरोबर सुशांतसोबत श्रद्धा कपूरला सुद्धा याठिकाणी बघितल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. सुशांतच्या या फॉर्महाऊसवर ड्रग्स पार्टीचे आयोजन केले जायचं का?, या दृष्टिने तपास केला जातोय.


जया सहा, श्रुती मोदीला परत पाठविले 
ड्रग्जबद्दल रियाच्या मोबाइल चॅटवर संभाषणातून ज्यांची नावे पुढे आली ती सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया सहा यांना बुधवारी एनसीबीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघी कार्यालयात पोहोचल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथक क्वारंटाइन झाल्याने दोघींना तातडीने परत पाठविण्यात आले असून, काही दिवसांनी त्यांना पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...'

 

Web Title: Narcotics bureau raid in mumbai rhea chakraborty case drug connection sushant case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.