धर्मा प्रॉडक्शनपर्यंत पोहोचला ड्रग्ज प्रकरणाचा तपास; या डायरेक्टरला बजावला समन्स
By रूपाली मुधोळकर | Published: September 24, 2020 04:12 PM2020-09-24T16:12:17+5:302020-09-24T16:12:37+5:30
एनसीबीच्या रडारवर 50 सेलिब्रिटी?
ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग या टॉपच्या अभिनेत्रींना समन्स जारी केला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकारही एनसीबीच्या रडारवर आहेत. आता हे ड्रग्ज कनेक्शन करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनपर्यंत पोहोचले आहे. धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज रवी प्रसाद याला सुद्धा एनसीबीने समन्स जारी केला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, क्षितीजला आज गुरुवारीच चौकशीसाठी बोलवले होते. मात्र सध्या तो दिल्लीत आहे आणि त्याला मुंबईत पोहोचायला वेळ लागणार असल्याने तो उद्या शुक्रवारी एनसीबीपुढे हजर होणार आहे. उद्या 11 वाजता एनसीबी क्षितीजची चौकशी करणार आहे. या चौकशीतून आणखी किती नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्षितीज रवी प्रसाद नोव्हेंबर 2019 मध्ये धर्मा प्रॉडक्शनशी जुळला होता आणि एक्झिक्युटिव्ह निर्माता म्हणून काम करत होता. त्याने बालाजी टेलिफिल्मसोबतही काम केले आहे. क्षितीजने स्पार्क क्रिएशन्स नावाची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम सांभाळते. याअंतर्गत ‘डॉली किट्टी के चमकते सितारे’ आणि ‘प्रसाद’ या सिनेमांची निर्मिती त्याने केली होती. जाहिरातीद्वारे क्षितीजने दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केले होते.
एनसीबीच्या रडारवर 50 सेलिब्रिटी?
ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आत्तापर्यंत 18 लोकांना अटक केली आहे. यात रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती शिवाय काही ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे. ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीतून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडचे 50 सेलिब्रिटी आहेत. तूर्तास एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग व श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे.
करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार
करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत?
करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीसंदर्भात एनसीबीत तक्रार
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी गेल्यावर्षी झालेली बॉलिवूड गँगची एक पार्टी चांगलीच वादात सापडली होती. या कथित ‘ड्रग्ज’ पार्टीला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. करणच्या घरी झालेल्या या लेट नाईट पार्टीची ड्रग्ज अँगलने चौकशी करण्याची मागणी करत शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली आहे.
मनजिंदर सिंग सिरसा यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘मी आज राकेश अस्थाना यांना नारकोटिक्स ब्युरो बीएसएफच्या दिल्ली येथील मुख्यालयी भेटलो. मी त्यांच्याकडे निर्माता करण जोहरविरोधात तक्रार दाखल केली. मुंबईत करण जोहरच्या घरी झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या व्हिडीओची चौकशी व्हावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली,’ असे ट्विट सिरसा यांनी केले आहे.
या ट्विटसोबत सिरसा यांनी एक पत्रही जोडले आहे. या पत्रात यांनी करण जोहरच्या पार्टीला हजर असलेल्या सर्व बॉलिवूड स्टार्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, वरूण धवन, अर्जुन कपूर, शाहिद कपूर अशा सर्वांच्या नावाचा उल्लेख आहे. या पार्टीत बॉलिवूड कलाकार ड्रग्जचे सेवन करताना दिसल्याचा दावाही सिरसा यांनी पत्रात केला आहे.