सुशांत प्रकरणात नवीन खुलासा, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकचं सीक्रेट चॅट आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:23 PM2020-09-18T12:23:38+5:302020-09-18T12:32:56+5:30
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलरमधील व्हॉट्सअॅप चॅटमधून झाला मोठा खुलासा
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलर अनुज केशवानी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठा खुलासा झाला आहे. या चॅटमधून अनुज आणि शोविक ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. तसेच या चॅटमध्ये ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत.
झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाचा भाऊ शोविक आणि ड्रग्स डिलर अनुज केशवानी यांचे एक चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये अनुज केशवानी आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. या चॅटमध्ये अनुज केशवानीने शोविकला बेकायदेशीर ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत. या चॅटनुसार पहिले अनुजने गांजाचे फोटो पाठवले मग शोविकने उत्तर दिले की ठीक आहे मला हे दे. जो माल पाठवणार आहे त्याची क्वॉलिटी चांगली ठेव, स्टफ चांगला ठेव. मागे जो माल आला होता तो चांगला नव्हता.
अनुज म्हणाला की हो ठीक आहे. मी स्वतः माल घ्यायला जातो आहे. शोविकचे उत्तर आले की थँक्स ब्रो, किती वाजता येणार डिलिव्हरी द्यायला.. हे ५० ग्रॅम असेल का? त्यावर अनुज केजवानीचं उत्तर आलं की साडे तीन चार वाजेपर्यंत. या चॅटमधून स्पष्ट समजतंय की हे ड्रग्स डिलेव्हरीबद्दल बोलणे चालू आहे.
सुशांतची हत्या की आत्महत्या
दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आहे की हत्या झाली आहे, याचा उलगडा लवकरच होणार आहे. कारण आणखी एक सीबीआयच्या टीममधील सदस्य मुंबईतील तपासानंतर परत आले आहेत आणि दुसरीकडे सुशांतच्या हत्येवर AIIMSचा रिपोर्टदेखील येणार आहे.
AIIMSच्या फॉरेसिंक डिपार्टमेंटचे प्रमुख सुधीर गुप्ता म्हणाले...
AIIMSमधील फॉरेसिंक डिपार्टमेंटचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले की या प्रकरणासंदर्भात मेडिकल बोर्डाची मिटिंग आणि सीबीआयची मिटिंग झाल्यानंतर मेडिकल बोर्डाचे मत सीबीआयला दिले जाईल. मला आशा आहे की हे पूर्णपणे निर्णायक असेल. त्यात कोणतीही शंका कुशंका राहणार नाही. हा रिपोर्ट अद्याप शेअर करू शकत नाही कारण कोर्टात केस आहे. पुढील आठवड्यात फॉरेसिंक टीमचा तपास आणि सीबीआयच्या चौकशी या सगळ्याचा विचार करून अंतिम मेडिकल मत बनवले जाऊ शकते.
यामुळे रियावर नाराज झाला होता सुशांत; फार्म हाऊस मॅनेजरचा दावा
ड्रग्स पेडलर्सचे इंटरनॅशनल कनेक्शन
सुशांत प्रकरणात एनसीबीला ड्रग्स पेडलर्सचे इंटरनॅशनल कनेक्शनदेखील समोर आले आहे. आतापर्यंतच्या तपासात एनसीबीला माहिती मिळाली होती की यात अनुज केशवानी आणि करमजीत इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होते. यातील एकाने २०१७ साली श्रीलंकामध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या रेव्ह पार्टीमध्ये भाग घेतला होता. ही माहिती मिळाल्यानंतर आता एनसीबी इंटरनॅशनल कनेक्शनचाही तपास करत आहेत.