बाळाचे वडील कोण? प्रश्न विचारणाऱ्यांना नुसरत जहाँ यांनी दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:34 PM2021-09-03T12:34:57+5:302021-09-03T12:35:35+5:30
Nusrat jahan: बाळाच्या जन्मानंतर अनेकांनी नुसरत यांना ट्रोल केलं. या बाळाचे खरे वडील कोण? असा प्रश्न ही नेटकऱ्यांनी त्यांना विचारला.
बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी पर्सनल लाईफ लाईफमुळे त्यांची चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या बाळामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, या बाळाच्या जन्मानंतर अनेकांनी नुसरत यांना ट्रोल केलं. या बाळाचे खरे वडील कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला. विशेष म्हणजे या ट्रोलर्सला नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
बाळाच्या जन्मानंतर नुसरत यांनी पहिल्यांदाच त्यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. ज्या व्यक्तींकडून तुम्ही कधीच सल्ले घेत नाहीत. त्या व्यक्तींच्या टीकेकडे सुद्धा लक्ष देऊ नका, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे काही नेटकऱ्यांनी या फोटोवरदेखील कमेंट करत नुसरत यांना ट्रोल केलं आहे. पुन्हा एकदा या बाळाचे वडील कोण असाच प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
'जय जय स्वामी समर्थ'फेम 'या' अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन
दरम्यान, नुसरत यांनी २६ ऑगस्ट रोजी एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून ईशान असं त्याच नाव ठेवण्यात आलं आहे. मात्र, या बाळाच्या जन्मानंतर या बाळाचे वडील कोण असा एकच प्रश्न नुसरत यांना विचारला जात आहे. मात्र, याविषयी नुसरत व प्रियकर यशदास गुप्ता यांनी मौन बाळगलं आहे. विशेष म्हणजे नुसरत यांनी निखील जैन यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव ते एकमेकांपासून दूर राहतात. इतकंच नाही तर नुसरत व निखील यांचं लग्न कायदेशीर नसल्याचंदेखील समोर आलं आहे.