कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने केले शूटिंग, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमध्ये अडकला अभिनेता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 13:36 IST2020-09-14T13:17:33+5:302020-09-14T13:36:03+5:30
संजय दत्तने किमो थेरपीचा पहिला राऊंड पूर्ण केला आहे.

कॅन्सरशी झुंज देताना संजय दत्तने केले शूटिंग, कॉन्ट्रॅक्टमधील अटींमध्ये अडकला अभिनेता ?
अभिनेता संजय दत्त शमशेराचे शूटिंग पूर्ण केले आहे. एकीकडे संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देतो आहे तर दुसरीकडे त्याने शूटिंगला सुरुवात केली होती. याआधी दिग्दर्शक अनुराग बासू आणि अभिनेता इरफान खानसुद्धा कॅन्सरशी लढा देताना शूटिंग केली होती. पण हे सगळे संजय दत्त त्याच्या सिनेमाविषयी असणाऱ्या प्रेमापोटी करतोय की कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या अटींमुळे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तने किमो थेरपीचा पहिला राऊंड पूर्ण केला आहे आणि दुसरा राऊंड सुरु होण्यापूर्वी त्याने शेमशेरच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, संजय दत्तची शमशेराची दीड दिवसांची शूटिंग बाकी आहे. हे सिनेमाचे रॅपअप शूट होते जे यशराज स्टुडिओमध्ये पूर्ण करण्यात आले. संजयचे दत्तचे राहिलेले पॅचवर्क पूर्ण करण्यात आले. तो शूटिंग एकटाच करत होता. या पॅचवर्कनंतर सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. यात रणबीर कपूर आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहेत.
'रुक जाना नहीं तू कहीं हार के'
अलीकडेच मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने संजय दत्तचा एक फोटोही शेअर केलाय. मान्यताने संजय दत्तच्या फोटोसोबत लिहिले की, ''रुक जाना नहीं तू कहीं हार के... कांटों पे चलके मिलेंगे साए बहार के!! हमें अपनी जिंदगी के बुरे दिनों का सामने करके बेहतर दिनों को कमाना पड़ता है!! कभी हार नहीं मानना चाहिए!!'. तर मान्यताने #inspiration #courage #strength #love #grace #positivity #dutts #challenging Yet #beautifullife #thankyougod या हॅशटॅगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात.
मान्यताने संजय दत्तचा फोटो केला शेअर, सांगितलं - परिवार कसा करतोय अडचणींचा सामना....