Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:06 PM2023-01-10T12:06:21+5:302023-01-10T12:18:35+5:30

यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. चित्रपटातील पठाणचा वनवास संपणार असं दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात किंग खान शाहरुखचा ४ वर्षांचा वनवास संपणार आहे.

pathaan-trailer-released-gets-2-million-views-in-half-hour-fans-praises-king-shahrukh-khan | Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

Pathaan Movie Trailer : भारतमातेच्या रक्षणासाठी 'पठाण' आलाय; Trailer बघितला का? काही वेळात मिळाले २० लाख व्ह्यूज

googlenewsNext

Pathaan Movie Trailer : यशराज फिल्म्सच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचे बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाले. चित्रपटातील पठाणचा वनवास संपणार असं दाखवण्यात आलं आहे तर खऱ्या आयुष्यात किंग खान शाहरुखचा ४ वर्षांचा वनवास संपणार आहे.  पॉवरपॅक अॅक्शनसह शाहरुख मोठ्या पडद्यावर येतोय. एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉग आणि अॅक्शन सीनने भरलेला पठाण २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तसेच यशराज फिल्म्सने पठाण मधून 'स्पाय युनिव्हर्स'ची (YRF Spy Universe) घोषणा केली आहे. म्हणजेच या युनिव्हर्स मध्ये हृतिकचा वॉर आणि सलमान खानचा टायगर या सिरीजही असण्याची शक्यता आहे. 

भारतमातेचे रक्षण करण्यासाठी 'पठाण' सज्ज 

देशावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आतंकवादी संघटनांविरोधात लढा द्यायला पठाण येतोय. देशभक्ती, अॅक्शन आणि जबरदस्त डायलॉगसह बहुचर्चित पठाण भेटीला येतोय. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही वेळातच ट्रेलरला २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत असून त्याचेही अॅक्शन सीन्स जबरदस्त दिसत आहेत. तर अभिनेत्री दीपिकाही एजंटच्या भूमिकेत बघायला मिळत आहे. 'पार्टी पठाण के घर मे रखोगे तो मेहमाननवाजी के लिए पठाण तो आएगा', एक Soldier यह नहीं पूछता देश ने उसके लिए क्या किया, पूछता है वह देश के लिए क्या कर सकता है अशा काही शाहरुखच्या डायलॉग्सने चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे. मात्र ट्रेलरमध्ये सलमान खानची झलक काही दिसत नाही यामुळे सलमानच्या चाहत्यांना चित्रपट प्रदर्शनाचीच वाट बघावी लागणार आहे.

'बेशरम रंग' हे पठाणचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आणि वाद सुरु झाला होता. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकीनीवर आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले. आता ट्रेलरमध्ये बेशरम रंग चा वेगळा शॉट दाखवण्यात आला आहे. तसेच काही डायलॉग बदलही लक्षात येत आहेत. पठाण फुल एंटरटेनमेंट पॅकेज असणार हे मात्र नक्की. 

Pathaan Movie : 'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती

तर या ट्रेलरमुळे आता चाहत्यांची उस्तुकता आणखी वाढली आहे. डॉन नंतर पुन्हा शाहरुख खानला अॅक्शन सीक्वेन्स करताना बघायला मिळणार आहे. यासाठी चाहत्यांना २५ जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. 

Web Title: pathaan-trailer-released-gets-2-million-views-in-half-hour-fans-praises-king-shahrukh-khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.