Pathan Movie : बक्कळ कमाईनंतर 'पठाण'च्या तिकीट दरात घट, ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:44 AM2023-02-01T09:44:18+5:302023-02-01T09:45:25+5:30

पठाणचे तिकीट या आठवड्यापासून स्वस्त झाले आहे. 'ब्रम्हास्त्र', 'दृश्यम' सारखाच फॉर्म्युला पठाणच्या मेकर्सने वापरला आहे.

pathan ticket price reduced still movie will earn more collection see what is the formula | Pathan Movie : बक्कळ कमाईनंतर 'पठाण'च्या तिकीट दरात घट, ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

Pathan Movie : बक्कळ कमाईनंतर 'पठाण'च्या तिकीट दरात घट, ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

googlenewsNext

Pathan Movie :  शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चा बॉक्सऑफिसवरील धुमाकूळ बघता चाहत्यांमध्ये किंग खानची क्रेझ काही कमी झालेली नाही. अगदी २ हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंतचे तिकीट काढून चाहते सिनेमा बघण्यासाठी जात आहेत. सहा दिवसात पठाण ने ३०० कोटींची बक्कळ कमाई केली आहे. तर वर्ल्डवाईड सिनेमाने ६०० कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान आता पठाणचे तिकीट या आठवड्यापासून स्वस्त झाले आहे. 'ब्रम्हास्त्र', 'दृश्यम' सारखाच फॉर्म्युला पठाणच्या मेकर्सने वापरला आहे. ते कसे बघुया.

मिड डे रिपोर्टनुसार, 'सोमवारपासून पठाण सिनेमाच्या तिकीटाच्या दरात २५ टक्के घट झाली आहे. दुसऱ्या आठवड्यापासून तिकीट दरात घट होणं हे तसं नेहमीचं आहे. पण पठाणच्या मेकर्सने पाच दिवसातच तिकीट दर कमी करत प्रेक्षकांना  गिफ्टच दिले आहे. पण याचा अर्थ हा नाही की तिकीट दरात घट झाल्यामुळे सिनेमाची कमाई कमी होईल. नक्की कसं असतं हे गणित  ?

सिनेमांचे डिस्ट्रिब्युशन वेगवेगळ्या मार्केट सर्किटनुसार होतं. दिल्ली सर्किटमध्ये दिल्ली, यूपी, उत्तराखंड येतात. तर मुंबई सर्किटमध्ये मुंबई, गोवा, गुजरात, महाराष्ट्र हे भाग आणि कर्नाटक देखील येते. एखादा सिनेमा सरकारच टॅक्स फ्री करते तेव्हा दर कमी होतात. तर अनेकदा डिस्ट्रिब्युटर नफा कमी करुन घेतात. याचा फायदा सिनेमालाच होतो.कमी किमतीत जास्त लोक सिनेमा बघायला जातात. साहजिकच कमाईमध्ये वाढ होते.

ब्रम्हास्त्र आणि दृश्यम २ ला झाला फायदा

'राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टीप्लेक्स ऑफ इंडियानं केवळ ७५ रुपयांतच सिनेमा दाखवण्याचा निर्णय घेतला होता. ७५ रुपयात सिनेमा बघता येत असल्याने प्रेक्षकही थिएटरमध्ये गर्दी करतात. 'ब्रम्हास्त्र' सिनेमाने १४ दिवसात ३.१५ कोटींची कमाई केली तर १५ व्या दिवशी ७५ रुपये तिकीट असल्याने सिनेमाने एकाच दिवसात १० कोटींची कमाई केली. तब्बल २०० टक्क्यांचा फायदा 'ब्रम्हास्त्र'ला झाला. अशाच प्रकारे दृश्यम २ आणि भूलभूलैय्याने देखील कमाई केली होती.

पठाणने सात दिवसात ३२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर मंगळवारच्या दिवशी २१ कोटींची गल्ला जमवला आहे. लवकरच पठाण ४०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असंच चित्र दिसत आहे.

Web Title: pathan ticket price reduced still movie will earn more collection see what is the formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.