प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:57 AM2020-08-19T09:57:00+5:302020-08-19T10:05:35+5:30

ओम राऊत हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करणार आहे. थ्रीडी व्हर्जनला तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही परदेशी भाषांमध्ये डब करून रिलीज केलं जाणार.

Prabhas talks about his new project Adipurush 3d movie and Tanhaji film director Om Raut's work | प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

googlenewsNext

रेट्रो फिल्म प्रॉडक्शन हाउसचा संस्थापक आणि तानाजी सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत 'आदिपुरूष' हा एक शानदार प्लॅन, उत्तम अॅक्शन सेट्स आणि अनोख्या व्हीएफएक्स कामासोबत नो होल्ड प्रोडक्शन असल्याचं सांगतो. त्याच्यासोबत या प्रोजेक्टमध्ये भूषण कुमार आहे जो या रेट्रो फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा सिनेमा स्क्रीनवर आणण्यासाठी त्यांची मदत करेल. तानाजीच्या  यशानंतर प्रभास ओम राऊतसोबत या सिनेमात काम करण्याबाबत उत्सुकही आहे.

ओम राऊत हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करणार आहे. थ्रीडी व्हर्जनला तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही परदेशी भाषांमध्ये डब करून रिलीज केलं जाणार. या सिनेमाती व्हिलन कोण असणार हे अजून ठरलं नाही. पण व्हिलनसाठी बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या नावाची चर्चा सुरू आहे.

'आदिपुरूष'बाबत बोलताना प्रभास म्हणाला की, 'प्रत्येक भूमिका आपल्या आव्हानांसोबत येत असतं. पण याप्रकारची भूमिका साकारण्यासाठी जबाबदारी आणि गौरव वाटतो. मी आपल्या या महाकाव्यातील ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. खासकरून ज्याप्रकारे ओमने याला डिझाइन केलंय, मला विश्वास आहे की, आपल्या देशातील तरूण आमच्या या सिनेमावर नक्कीच प्रेम करतील'.

'आदिपुरूष'बाबत दिग्दर्शक ओम राऊत म्हणाला की, 'मी माझ्या या ड्रीम प्रोजेक्टला साकार करण्यासाठी आणि माझ्या व्हिजनचा भाग होण्यासाठी, कोणत्याही अटी विना समर्थन देण्यासाठी प्रभासचा आभारी आहे. सोबतच भूषणजींचा देखील मी आभारी आहे. गर्वाने हे काम आम्ही सुरू करतो आणि आपल्या प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देण्याचा विश्वास देतो. जसा कधीही मिळाला नसेल'.

'साहो' आणि 'राधे श्याम'नंतर भूषण कुमारसोबत आदिपुरूष हा प्रभासचा तिसरा सिनेमा असेल. तर ओम राऊतसोबतचा हा त्याचा पहिला सिनेमा आहे. हे त्रिकुट नक्कीच यशाचं नवं शिखर गाठतील. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर द्वारा निर्मित हा सिनेमा सद्या प्री-प्रोडक्शन स्टेजवर आहे. २०२१ पर्यंत फ्लोरवर आणि २०२२ मध्ये रिलीज होऊ शकतो.

हे पण वाचा :

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

Web Title: Prabhas talks about his new project Adipurush 3d movie and Tanhaji film director Om Raut's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.