'हा' बॉलिवूड अभिनेता रियासोबत काम करण्यासाठी तयार, म्हणाला - आम्ही वाट बघू....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:07 AM2020-09-09T11:07:32+5:302020-09-09T11:10:16+5:30
आता अभिनेता-निर्माता निखील द्विवेदीने रियासाठी काही ट्विट्स केले आहेत. ज्यात निखीलने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनात समोर येत आहेत. अनेकांनी रियाच्या टी-शर्टवरील मेसेज सोशल मीडियात शेअर करून तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे. आता अभिनेता-निर्माता निखील द्विवेदीने रियासाठी काही ट्विट्स केले आहेत. ज्यात निखीलने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
#Rhea I didn't kno u. I dn't kno wht kind of person u r. May b u r as bad as u r being made out to b. May b u r not. Wht I do kno is tht how its all played out for u is unfair, unlawful ¬ how civilised countries behave. Whn all ths is over we wud like to work wth u @Tweet2Rhea
— Nikhil Dwivedi (@Nikhil_Dwivedi) September 8, 2020
निखिल द्विवेदीने ट्विटमध्ये लिहिले की, 'रिया, मी तुला ओळखत नाही. मला नाही माहीत तू कशाप्रकारणी व्यक्ती आहे. कदाचित तू तेवढी वाईट आहेस, जेवढी तुला दाखवलं जात आहे. कदाचित नसशीलही. मला केवळ हे माहीत आहे की, तुझ्यासोबत जे होत आहे ते फार चुकीचं आहे. बेकायदेशीर आहे. जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल'.
She has been arrested by narcotics department for peddling drugs. Kindly don't make a hero out of her and spoil our next generation. I thought you are one sane voice from Bollywood. Thanks for dropping the mask so soon. https://t.co/Fd59LEyobd
— Anagha Talwalkar (@anaghaudaypujar) September 8, 2020
त्यानंतरच्या एका ट्विटमधून निखिलला ट्रोल करण्यात आलं. यावर त्याने उत्तर दिलं की, कोर्टाने रियाला दोषी ठरवलंय का? जर त्यांनी ठरवलं तरी आपण रियात सुधार होण्याची वाट बघू. जर रियात काहीच सुधारणा झाली नाही तर मी माझे शब्द परत घेईन. पण मीडिया आणि जनतेने आपला निर्णय सुनावण्याची गरज नाही. माझं समर्थन #Innocentuntilprovenguilty च्या साठी आहे. #RheaChakraborty साठी नाही.
To those who think I am supporting a drug user or drug peddler &trolling me.. I wud like to say I DON'T CARE! I m NOT supporting #Rhea but standing up to our tendency to pronounce judgments before law has. I was as disturbed whn men were ousted of their jobs on #Metoo allegations
— Nikhil Dwivedi (@Nikhil_Dwivedi) September 9, 2020
निखिल द्विवेदी म्हणाला की, रिया केसमध्ये टीव्ही स्टुडिओ आणि सोशल मीडियाने आपलं जजमेंट पास केलंय. जे आता बंद व्हायला पाहिजे. निखिलने स्पष्ट केलं की, तो ड्रग यूजर किंवा ड्रग पेडलर्सना सपोर्ट करत नाहीये. ना तो रियाला सपोर्ट करतोय. पण कोर्टाच्या निर्णयाआधी ज्याप्रकारे रियाला दोषी ठरवण्यात आलं तो त्याचा विरोध करतो.
दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी रियाच्या अटकेनंतर तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर एक खासप्रकारचा मेसेज शेअर करून तिला सपोर्ट केलय.
मंगळवारी रिया चक्रवर्तीला अटकेनंतर चांगलीच चर्चा रंगली. तसेच तिने घातलेल्या टी-शर्टवरील टेक्स्टही चांगलीच चर्चेत राहिलं. त्यावर लिहिलं होतं की, 'गुलाब लाल असात, वॉयलेट्स निळे असतात, आपण सगळे मिळून पितृसत्तेचा हा किल्ला उद्धवस्त करू'. आता रियाच्या टी-शर्टवरील हा मेसेज तिच्या समर्थनाचं माध्यम ठरला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीने हा संदेश शेअर करून रियाला सपोर्ट केलाय आणि तिच्या अटकेला विरोध केलाय.
अनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिबानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या संदेशाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेलिब्रिटींनी #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हे हॅशटॅग वापरले. जे आता ट्रेन्ड करत आहेत.
हे पण वाचा :
सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’