2026 च्या ऑलिम्पिकसाठी R. Madhvan चा मुलगा करतोय तयारी, 'या' देशात झाला शिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:04 PM2021-12-17T22:04:58+5:302021-12-17T22:05:14+5:30
अभिनेता आर माधवनचा मुलगा राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियन आहे. भारतात अपुऱ्या सुविधेमुळे सरावावर परिणाम होतोय. यामुळेच आर माधवन याने मुलासोबत दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: एकीकडे इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण करण्याची तयारी करत आहेत. तर, दुसरीकडे प्रतिभावान अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मुलगा ऑलिम्पिक पदक जिंकण्याची तयारी करत आहे. बऱ्याच जणांना माहित आहे की, आर माधवनचा मुलगा वेदांत राष्ट्रीय जलतरण चॅम्पियन आहे. राष्ट्रीय पदके जिंकल्यानंतर आता तो ऑलिम्पिकच्या दिशेने झेप घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर माधवनचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. यासाठीच माधवनने एक मोठे पाऊल उचलले आहे.
मुलासाठी माधवन दुबईला शिफ्ट होणार
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन आगामी 2026 ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची तयारी करत आहे. पण, भारतात मोठ्या तलावांची कमतरता आहे आणि जे तलाव आहेत, ते महामारीमुळे बंद आहेत. त्यामुळेच वेदांतच्या सरावावर मोठा परिणाम होत आहे. भारतातील तलाव बंद असले तरी, दुबईमध्ये अनेक मोठे तलाव आहेत. त्यामुळेच आता वेदांताच्या सरावासाठी आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी दुबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
वेदांत अभिनेता होणार नाही
अनेक अभिनेत्यांची मुले प्रतिभा नसतानाही चित्रपट क्षेत्रात येत आहेत. पण, आर माधवनने सांगितले की, त्याच्या मुलाला अभिनयात रस नाही. भविष्यातही अभिनय क्षेत्रात येण्याची कोणती योजना नाही. त्याची आणि पत्नीची इच्छा आहे की, त्यांच्या मुलांने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवावे. ते नेहमी त्याच्या पाठीशी उभे असतील. सध्या वेदांतचे लक्ष आगामी ऑलिम्पिककडे आहे. वेदांत केवळ आर माधवनचेच नव्हे तर भारताचे नावही रोशन करेल अशी अपेक्षा आहे.
वेदांत 7 राष्ट्रीय पुरस्कारांचा विजेता आहे
वेदांत माधवन उत्तम जलतरणपटू आहे. वेदांतला जलतरणात 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडेच, वेदांतने 47 व्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके जिंकली. ही स्पर्धा बंगळुरू येथे पार पडली होती. वेदांतने या स्पर्धेत चार रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके जिंकली.