अभिनेता मोहित बघेलचे निधन, सलमानच्या 'रेडी' सिनेमात साकारली होती भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:31 PM2020-05-23T18:31:27+5:302020-05-23T18:38:51+5:30
मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता.
अभिनेता मोहित बघेलचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या लहान वायत मोहितने जगाचा निरोप घेतला ही बातमी ऐकताच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मोहित मेरे भाई इतनी जल्दी क्या थी जाने की?
— Raaj Shaandilyaa (@writerraj) May 23, 2020
मैंने तुझसे कहा था देख तेरे लिए सारी इंडस्ट्री रुक गयी है जल्दी से ठीक होके आजा उसके बाद ही सब काम शुरू करेंगे,
तू बहुत अच्छी एक्टिंग करता है,इसलिए अगली फिल्म के सेट पे तेरा इंतज़ार करूँगा...और तुझे आना ही पड़ेगा
ॐ साई राम #cancer RIP pic.twitter.com/FD2lE3tHJz
2011 मध्ये मोहितने सलमान खानसोबत 'रेड्डी' चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने 'जय हो' या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.
Never thought in my dreams also that we will loose you so soon, An actor who showed his amazing acting skills in #Ready film with @BeingSalmanKhan A great friend, brother and superb human @baghelmohit#RIP#MohitBaghelpic.twitter.com/461rtwBdhD
— Gurpreet Kaur Chadha (@GurpreetKChadha) May 23, 2020
मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.