विचित्र योगायोग! रियाच्या अटकेनंतर व्हायरल होतेय तिचे 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 10:14 AM2020-09-09T10:14:53+5:302020-09-09T10:15:26+5:30
रियाच्या अटकेवरचे अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झालेत. शिवाय तिचे 11 वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटचीही चर्चा रंगली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणी काल अटक झाली. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. रियाच्या अटकेनंतर सोशल मीडियावर सुशांतचे चाहते अॅक्टिव्ह झालेत. रियाच्या अटकेवरचे अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झालेत. शिवाय तिचे 11 वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटचीही चर्चा रंगली. 11 वर्षांपूर्वीच्या या ट्वीटमध्ये असे काय होते? तर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुरुंगात जाणा-या एक भारतीय मुलीचा उल्लेख.
होय, 2009 साली रिया चक्रवर्तीने एक ट्वीट केले होते. यामध्ये ज्यामध्ये तिने ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुरुंगात जाणा-या भारतीय मुलीचा उल्लेख केला होता. ‘नुकतीच एका भारतीय मुलीच्या एका भयानक कथेतून बाहेर आले. जिने अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी चार वर्षे तुरुंगवास भोगला...’, असे हे ट्वीट होते.
kuch bhi kaho, ladki mein confidence tha.. ek din avashya aisa kuch kar ke dikhayegi.. https://t.co/XIQOcRMWBL
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) September 8, 2020
रियाने हे ट्वीट कोणत्या संदर्भाने केले होते, हे ठाऊक नाही. मात्र नियतीचा योगायोग असा की, 11 वर्षांनंतर खुद्द रियाच ड्रग्ज प्रकरणात अडकली आणि तिला अटक झाली.
She herself wrote this, despite knowing the consequences of Narcotic Trafficking she still supplied. It shows her mentality.
— DANNY MOSES (@dannymoses17) September 8, 2020
Good work @Being_Humor#RheaArrested#JusticeForSSR
रियाला अटक होताच काही तासात रियाचे हे 11 वर्षे जुने ट्वीट चर्चेत आले. या ट्वीटच्या निमित्ताने नेटिझन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रियाने कदाचित स्वत:बद्दलच भविष्यवाणी केली होती, जी आज खरी ठरली आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
Who knew.. rhea was talking about herself
— Shweta 🇮🇳 (@Savage_shree) September 8, 2020
तर होऊ शकते इतकी शिक्षा?
ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळल्यास रियाला एनडीपीसी 20 बी कलमांनुसार दहा वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कलम 27 अंतर्गत एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर कलम 22 अंतर्गत दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. रियाच्या गौरव आर्य सोबतच्या 2017 च्या चॅटमध्ये तिने एमडीएमए घेतल्याचे समोर आले आहे. एमडीएमए हे ड्रग कुणाकडे अर्ध्या ग्रॅमपेक्षा जास्त आढळल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात.
रियाचा यु-टर्न
एनसीबीच्या चौकशीत आधी आपण ड्रग्ज घेत नसल्याचे रियाने म्हटले होते. मात्र तिस-या दिवशीच्या चौकशीत रियाने अचानक रियाने यु-टर्न घेत, आपला जबाब बदलला होता. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही, असे म्हणणा-या रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले होते. मात्र सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी विवश केले, असे तिने म्हटले होते.
मंगळवारी चौकशीदरम्याने रियाने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली होती. सुशांतने आग्रह केल्यामुळे कदाचित मी कधी गांजाचे सेवन केले असावे, असे तिने या चौकशीदरम्यान म्हटले होते. यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता. अगदी आज तकला दिलेल्या मुलाखतीतही तिने ठासून हा दावा केला होता. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही. मी ब्लड टेस्टसाठीही तयार आहे, असे तिने म्हटले होते.
‘सॉरी बाबू’! रियाच्या अटकेनंतर सुशांतचे चाहते झालेत अॅक्टिव्ह; ट्विटरवर मजेदार मीम्सचा पूर