म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:31 PM2020-09-08T14:31:07+5:302020-09-08T14:31:29+5:30

यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता. 

rhea chakraborty accepts that she might have smoked joint sushant forced to take drugs | म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी तपासातून आणखीन नवीन ट्वीस्ट समोर येत आहे. सुशांतच्या बहिणीविरोधात रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती पुरती अडकली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने सलग तिस-या दिवशी रियाला चौकशीसाठी बोलवले आहे. काल सोमवारीही रियाची दीर्घकाळ चौकशी झाली. मात्र आता रियाने यु-टर्न घेत, आपला जबाब बदलला आहे. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही, असे म्हणणा-या रियाने आता ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे. मात्र सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी विवश केले, असे तिने म्हटले आहे.
टाइम्स नाऊने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसार, मंगळवारी चौकशीदरम्याने रियाने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली. सुशांतने आग्रह केल्यामुळे कदाचित मी कधी गांजाचे सेवन केले असावे, असे तिने या चौकशीदरम्यान म्हटल्याचे कळतेय.

आधी ठासून केला होता हा दावा
यापूर्वीच्या जबाबात रियाने ड्रग्ज व गांजाचे कधीही सेवन न केल्याचा दावा केला होता. अगदी आज तकला दिलेल्या मुलाखतीतही तिने ठासून हा दावा केला होता. मी कधीही ड्रग्ज घेतले नाही. मी ब्लड टेस्टसाठीही तयार आहे, असे तिने म्हटले होते. मात्र आता एनसीबीच्या चौकशीत रियाने अचानक यु-टर्न घेतला आहे.

 अटकेची टांगती तलवार
सुशांत सिंग प्रकरणी रियाच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगलेली आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली. आत्तापर्यंत एनसीबीने याप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या भावासह सहा लोकांना अटक केली आहे.

नवीन ट्वीस्ट
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी तपासातून आणखीन नवीन ट्वीस्ट समोर येत आहे. सुशांतच्या बहिणीविरोधात रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.सुशांतची बहिण प्रियांका, मितू आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रियाने या तिघांवर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप

Web Title: rhea chakraborty accepts that she might have smoked joint sushant forced to take drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.