अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:50 PM2020-09-09T16:50:50+5:302020-09-09T16:51:10+5:30

शिबानीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. 

rhea chakraborty friend shibani dandekar takes a dig at ankita lokhande |  अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

 अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतच्या कुटुंबीयांना रिया आवडत नव्हती, असा दावाही शिबानीने अलीकडे केला होता. 

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने मंगळवारी अटक केली. यानंतर रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कालची रात्र रियाने एनसीबीच्या कोठडीत घालवली आणि आज सकाळीच तिला भायखळा कारागृहात शिफ्ट केले गेले़. रिया चक्रवर्तीला अटक झाल्याने सुशांतचे चाहते सुखावले आहेत. मात्र बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी या अटकेवर संतप्त प्रतिक्रिया देत रियाच्या बाजूने आवाज उठवला आहे. रियाची जुनी मैत्रिण शिबानी दांडेकर यापैकीच एक. शिबानीची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये तिने अप्रत्यक्षपणे सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिला लक्ष्य केले आहे.

शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. तिने यात लिहिले, ‘पुरूषप्रधान संस्कृतीच्या प्रिन्सेसला मीडियात पाहण्यासारखे वाईट दुसरे काहीही नाही. जी आता पूरेपूर फायदा लाटताना दिसतेय. एका तरूणीबद्दल घाणेरड्या गोष्टी बोलतेय आणि तिच्या अटकेचे सेलिब्रेशन करतेय. हा खटाटोप कशासाठी तर यामुळे तिला टीआरपी व अटेंशन मिळतेय. ’
ही प्रिन्सेस कोण, हे आपल्याला ठाऊक आहे. असे वाटते जणू तिला कर्म आणि नशीबाबद्दल खूप काही ठाऊक आहे. मी तिला टॅग केले असते, पण ती कोण हे तुम्हाला ठाऊक आहेच, अशा शब्दांत शिबानीने अंकिताला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.
रियाच्या अटकेवर अंकिताने प्रतिक्रिया देत ‘कर्म तुमचे नशीब ठरवते,’ अशी पोस्ट केली होती. तिच्या या पोस्टवरून शिबानीने तिला टोला लगावला आहे.

रिया १६ वर्षांची असल्यापासून मी तिला ओळखते....

काही दिवसांपूर्वी विद्या बालन, तापसी पन्नू या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिबानी दांडेकर रियाला सपोर्ट करताना दिसली होती. शिबानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर रियाला पाठिंबा दिला होता.   रियाने सुशांतवर प्रेम केले याचीच तिला शिक्षा मिळतेय, अशी ती म्हणाली होती.
‘रिया १६ वर्षांची असल्यापासून मी तिला ओळखते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मी तिची आणि तिच्या कुटुंबाची एक नवीनच बाजू पाहते. ज्याचा आपण विचार करु शकत नाही अशा गोष्टी, त्रास ते सहन करत आहेत. प्रसारमाध्यमे कशाप्रकारे त्यांच्यासोबत वागत आहेत हे दिसून येतेय. एका निरपराध कुटुंबावर आरोप करण्यात येत आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होईल इथपर्यंत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे,’ असे शिबानी म्हणाली होती.

'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

सुशांतच्या कुटुंबाला रिया आवडत नव्हती...

सुशांतच्या कुटुंबीयांना रिया आवडत नव्हती, असा दावाही शिबानीने अलीकडे केला होता. ‘जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करता तेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंबीयसुद्धा तुमच्या बाजूने असतील याची खात्री नसते. हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. रियासोबत सुशांतच्या बहिणींचे पटत नव्हते आणि रियाने ही गोष्ट सुशांतला सांगितली होती. काही वेळा कुटुंबीयांसोबत गर्लफ्रेंडचं पटत नाही. पण अशावेळी तिनेच हत्या केली असा त्याचा अर्थ होतो का? किंवा तिने आत्महत्येला प्रवृत्त केले  असा होतो का? हे प्रत्येकासाठी लॉकडाउनमधील मनोरंजन झालेय का? असा सवाल शिबानीने केला होता.

अंकिता लोखंडेने दाखवला ‘पॉवर ऑफ वुमन’, रिया चक्रवर्तीच्या ‘विधवा’ कमेंटवर असे दिले प्रत्युत्तर

Web Title: rhea chakraborty friend shibani dandekar takes a dig at ankita lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.