आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:16 PM2020-09-07T17:16:01+5:302020-09-07T17:34:46+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Rhea chakraborty may soon be taken into custody by ncb | आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. ईडीच्या चौकशीत रिया आणि शौवितमध्ये झालेले फोनवरील ड्रग्स चॅट समोर आले होते. ईडीने हे चॅट सीबीआय आणि एनसीबीकडे सोपवले. यानंतर एनसीबीने चौकशी सुरु करत अनेक ड्रग्स पेडलर्सने अटक केली आहे. आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता आहे.   

रिया स्वत:च अडकली आपल्या जाळ्यात 
काही दिवसांपूर्वी अजतकला दिलेल्या मुलाखतीत रियाने आपला ड्रग्स डिलमध्ये कोणताच सहभाग नसल्याचे सांगितले होते. मात्र रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सांवतला अटक झाल्यानंतर त्यांनी थेट रियाचे नाव घेतले. शौविकने   रियाच्या सांगण्यावरून ड्रग्स खरेदी केल्याची कबूली दिली आहे. 

आपल्याच बोलण्यावरुन पलटली रिया 
एनसीबीच्या चौकशीत रियाने मान्य केले आहे की, सुशांतसाठी ती ड्रग्स विकत घ्यायची. मात्र आपण कधीच ड्रग्सचे सेवन केलं नसल्याचे रियाचे म्हणणे आहे. धूम्रपान आणि मद्यप्राशन करत असल्याचे रियाने स्वीकारले आहे, पण ड्रग्स कधीच घेतले नाही असे तिचं म्हणणे आहे. 


रियाला होऊ शकते अटक
रविवारी चौकशीच्या आधी वकिलांनी असे विधान केले की, रिया चक्रवर्ती अटक होण्यास तयार आहेत. तेव्हा असा अंदाज लावण्यात आला होता की रियाला अटक होऊ शकते. मात्र रविवारी चौकशी करुन एनसीबीच्या टीमने रियाला घरी पाठवले आज पुन्हा तिला चौकशीसाठी बोलविले आहे.आता असे म्हटले जात आहे की, रियाने चौकशीला पूर्ण सहकार्य न केल्यास, शौविक चक्रवर्ती यांना ज्या आधारावर अटक केली गेली आहे त्याच आधारावर तिला ताब्यात घेतले जाऊ शकते.

Web Title: Rhea chakraborty may soon be taken into custody by ncb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.