"हा काय ज्येष्ठ नागरिक आहे का?" कोरोना लस घेतल्यामुळं सैफ अली खान झाला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:20 PM2021-03-06T16:20:21+5:302021-03-06T16:24:00+5:30
सैफ अली खानने बिकेसीमधील कोव्हिड वॅक्सिन सेंटरमध्ये जाऊन लस घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना आजाराला घेऊन थोडी अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीरकजे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून नागरिक लांबच्या लांब रांगा लावून लस घेत आहेत. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असून सोबतच ४५ ते ५९ वर्षांच्या परंतु, गंभीर आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही करोना लस दिली जात आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटींमध्ये देखील लसीकरणासाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अशात सैफ अली खानचा लस घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सैफ अली खानने बिकेसीमधील कोव्हिड वॅक्सिन सेंटरमध्ये जाऊन लस घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. “हा काय ज्येष्ट नागरिक आहे का? सेलिब्रिटींसाठी एक नियम आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा नियम ?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत नेटीझन्सने सध्या सैफला चांगलेच ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सैफ अली खानने कामातून ब्रेक घेत कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. करिनाची दुसरी डिलेव्हरी होण्याआधीच त्याने पितृत्व रजा घेतली होती. छोट्या नवाबच्या आगमनानंतर सैफ संपूर्ण वेळ करिना आणि मुलांसोबतच घालवत आहे. बाळाला अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून सैफने पॅटर्निटी लिव्ह घेतली आहे. आपल्या मुलाला वाढताना बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चुकताय. त्यामुळे बाळासोबत मनसोक्त वेळ घालवणार असल्याचे सैफने आधीच सांगितले होते.
2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता. दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. दुस-या प्रेग्नंसीदरम्यानही करिना अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत काम करत होती. त्यामुळे डिलेव्हरीनंतर करिना आणि सैफ दोघांनीही कामातून ब्रेक घेत मुलांसह फुल ऑन एन्जॉय करत आहेत.