Birthday Special: हिट चित्रपट देऊनही सलमान खानला मिळत नव्हतं काम, वडिलांना करावी लागली होती शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:25 PM2020-12-26T17:25:21+5:302020-12-26T17:28:06+5:30

मैंने प्यार किया हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी सहा महिने उलटून गेल्यानंतरही सलमानला कोणता चित्रपट मिळत नव्हता.

Salman Khan Birthday Special: After Maine Pyar Kiya became a hit, salman was jobless | Birthday Special: हिट चित्रपट देऊनही सलमान खानला मिळत नव्हतं काम, वडिलांना करावी लागली होती शिफारस

Birthday Special: हिट चित्रपट देऊनही सलमान खानला मिळत नव्हतं काम, वडिलांना करावी लागली होती शिफारस

googlenewsNext
ठळक मुद्देमैंने प्यार किया हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी सहा महिने उलटून गेल्यानंतरही सलमानला कोणता चित्रपट मिळत नव्हता.

सलमान खानचा उद्या वाढदिवस असून तो प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. सलीम खान यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सलमानने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. 

सलमानचे खरे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान असून त्याला अरबाज, सोहेल, अल्वीरा, अर्पिता अशी चार भावंडं आहेत. सलमानने बिवी हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात रेखा, फारूक शेख, कादर खान, बिंदू आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. चित्रपट हिट ठरला असला तरी या चित्रपटातील सलमानच्या भूमिकेचे कौतुक झाले नव्हते. या चित्रपटानंतर काही महिन्यांनंतर त्याला मैंने प्यार किया या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील सुमन-प्रेम यांची प्रेमकथा लोकांना चांगलीच भावली. या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांना आवडली. मैंने प्यार किया हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी सहा महिने उलटून गेल्यानंतरही सलमानला कोणता चित्रपट मिळत नव्हता. अखेर त्याचे वडील सलीम खान यांनी त्याची मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी जी.पी. सिप्पी यांना सलमानला घेऊन ते चित्रपट करत असल्याची घोषणा करायला सांगितले होते.

सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉटेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमान लोकांच्या हृदयावर राज्य करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. बिग बॉस कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन देखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

Web Title: Salman Khan Birthday Special: After Maine Pyar Kiya became a hit, salman was jobless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.