Katrina Kaif - Vicky Kaushal Wedding : सलमानला सोडून शेराला मिळालं कतरिना-विकीच्या लग्नाचं आमंत्रण; सोपवलीये मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:42 PM2021-12-06T16:42:03+5:302021-12-06T16:43:05+5:30
Shera: येत्या ९ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विकी-कतरिनाचा हा लग्नसोहळा रंगणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal)लग्नगाठ बांधणार आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. राजस्थानमध्ये पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्यात अत्यंत मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात अभिनेता सलमान खान (salman khan) आणि रणबीर कपूर (ranbir kapoor)यांना वगळण्यात आल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर आता या लग्नात सलमानऐवजी त्याच्या बॉडीगार्डला शेराला (Shera) लग्नाचं आमंत्रण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याकडे विकी-कतरिनाने लक्ष दिलं आहे. सुरक्षेपासून ते पाहुण्यांच्या देखरेखीपर्यंत प्रत्येक गोष्ट योग्य असावी याकडे दोघांचा कल आहे. इतकंच नाही तर या दोघांच्या सुरक्षेची जबाबदारी सलमानच्या शेरावर सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, याविषयी शेरा किंवा विकी-कतरिनाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
विकी-कतरिनाच्या सुरक्षेची जबाबदारी शेराच्या खांद्यावर
'पिंकविला'च्या वृत्तानुसार, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याची एक सिक्युरिटी एजंसी आहे. टायगर सिक्युरिटी असं त्याच्या एजंसीचं नाव असून या एजंसीला विकी-कतरिनाच्या वेडिंग वेन्यूवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सिक्स सेन्स फोर्ट येथे शेराची कंपनी सुरक्षा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या लग्नासाठी विकी-कतरिनाने अनेक नियम व अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नसोहळ्यात सेल्फी वा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे हा लग्नसोहळा अत्यंत प्रायव्हेट पद्धतीने होणार आहे. सध्या सोशल मीडियावर #Vickat हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.