Sandeep Nahar Suicide : एमएस धोनी, केसरी सिनेमात काम केलेल्या अभिनेता संदीप नाहरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी फेसबुकवर लिहिली सुसाइड नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:40 AM2021-02-16T00:40:06+5:302021-02-16T06:42:03+5:30
Akshay kumar kesari co actor Sandeep Nahar dies suicide or murder police investigation : संदीप नाहरचा मृतदेह मुंबईतील गोरेगावमधील त्याच्या राहत्या घरात सापडला आहे. त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे.
मुंबई : अभिनेता संदीप नाहर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार संदीप नाहरने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
संदीप नाहरचा मृतदेह मुंबईतील गोरेगावमधील त्याच्या राहत्या घरात सापडला आहे. त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. तसेच, त्याची एक फेसबुक पोस्टही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. या पोस्टचाही पोलीस तपास करत आहेत. SSR's Co-star in 'MS Dhoni' Sandeep Nahar Dies By Suicide; Shares Note on Facebook
'कहने को हमसफर हैं', 'एमएस धोनी', 'केसरी' या चित्रपटांतून संदीप नाहर Sandeep Nahar प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. फेसबुकवर जवळपास मृत्यूच्या तीन ते चार तासांपूर्वी त्यांनी एक सोशल मीडिया पोस्टही लिहिली होती. जी पाहता ही त्यांची सुसाईड नोट आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे.
संदीप नाहरने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलेलं?
"आता जगण्याचीच इच्छा उरलेली नाही. जीवनात अनेक सुखदु:ख पाहिली. पण, सध्याच्या घडीला मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे योग्य नाही मला माहिती आहे. मलाही जगायचे होते. पण जिथं सेल्फ रिस्पेक्ट नाही, समाधान नाही तिथे जगून काय फायदा. माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शरमा यांनी मला कधीच समजून घेतले नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको हायपर आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. रोजचीच भांडणं ऐकण्याची ताकद माझ्यात नाही. यामध्ये तिची काहीही चूक नाही, तिला सर्वकाही सुरळीत वाटतं. पण माझ्यासाठी हे सामान्य नाही."
"मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधी खचलो नाही. बाऊन्सर होतो, डबिंग केलं, जीम ट्रेनरही होतो. वन रूम किचनमध्ये सहा जण राहायचो. स्ट्रगल करत होतो पण समाधानी होतो. आज मी काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. दोन वर्षांपासून आयुष्य पूर्ण बदललं आहे आणि हे सर्वकाही मी कुणासोबत शेअरही करू शकत नाही. जगाला वाटतं आमचं सर्व किती चांगलं सुरू आहे. कारण ते आमचे सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सर्वकाही खोटं असतं. जगाला दाखवायला. इमेज चांगली राहावी यासाठी हे टाकतो पण खरं एकदम विरुद्ध आहे. आमचं अजिबात पटत नाही."
"मी आत्महत्या खूप आधीच केली असती. पण मी स्वतःला वेळ दिली. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केलं. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदानं उचलावं लागेल. इथं या आयुष्यात नरक मिळालं कदाचित इथून गेल्यानंतर तिथलं आयुष्य कसं असेल मला माहिती नाही. पण मला इतकं माहिती आहे, मी त्याचा सामना करेन. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीही बोलू नका, फक्त तिच्या मेंदूचा उपचार जरूर करून घ्या", असं त्यानं फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.