थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:37 PM2020-09-18T14:37:54+5:302020-09-18T14:45:48+5:30

संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेतो आहे.

Sanjay dutt suffering from 4th stage lungs cancer looks very week in family photo | थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला

थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला

googlenewsNext

संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेतो आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. सध्या संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत दुबईमध्ये आहे. रिपोर्टनुसार संजय दत्त पत्नीसोबत चार्टर्ड फ्लाइटने मुलगा शहरान आणि इकराला भेटण्यासाठी दुबईला गेला आहे. संजय दत्तला मुलांना भेटण्याची फार इच्छा झाली होती म्हणून तो दुबईला पोहोचला. मान्यताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फॉमिली फोटो शेअर केला आहे. ज्यात संजय दत्त खूप कमजोर झालेला दिसतोय. 

मान्यताने जो फोटो शेअर केला आहे त्यात संजयचे गाल आत गेलेले आणि चेहरा थकलेला. आजारपणामुळे तो खूप अशक्त झाले दिसतोय. तरीही या फोटोत संजय हसण्याचा प्रयत्न करतोय. 

मान्यताने लिहिली भावूक पोस्ट
मान्यताने हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले, आज मी देवाचे आभार मानते, ज्याने मला इतकं सुंदर कुटुंब दिले. माझी कोणतीच तक्रार नाही आहे, कोणतीच विनंती नाही, फक्त आम्ही सगळे कायमचे असेच एकत्र राहुदेत... आमीन



उपचारांचा कामावर होऊ दिला नाही परिणाम
कॅन्सवर उपचार घेत असताना संजय दत्तने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. त्याने शेमशेरच्या शूटिंग केले. उपचारांसोबत संजय दत्त शमशेरावरसुद्धा फोकस देतो आहे.  पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुबईवरुन 10 दिवसांत संजय दत्त परतल्यानंतर त्याची दुसरी किमोथेरेपी सुरु करणार आहे. 

VIDEO : संजय दत्तने मास्कवरून घेतली फोटोग्राफर्सची शाळा, म्हणाला - मास्क लगा ना...

 

Web Title: Sanjay dutt suffering from 4th stage lungs cancer looks very week in family photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.