संजय दत्तच्या आयुष्यात कॅन्सर परतला, याआधी याच आजाराने हिरावून घेतला होता आयुष्यातला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:55 AM2020-08-12T11:55:52+5:302020-08-12T11:56:14+5:30
कॅन्सर!! याच आजाराने त्याची आई त्याच्यापासून हिरावून घेतली होती.
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. त्याचा कर्करोग तिस-या टप्प्यात आहे. त्यामुळे संजय दत्त उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. आपण चित्रिकरणापासून काही वेळ लांब राहणार असल्याची माहिती संजय दत्तने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेत असल्याचे संजय दत्तने ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर काही तासांतच त्याला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याची बातमी आली.
याआधी कर्करोगानेच संजयच्या आनंदाला ग्रहण लावले होते. याच आजाराने त्याची आई त्याच्यापासून हिरावून घेतली होती.
संजयची आई नर्गिस यांना कॅन्सर होता. याच आजाराने त्यांचा मृत्यू झाला. संजयच्या वडिलांनी नर्गिस यांना वाचवण्याचे अथक प्रयत्न केलेत. पण सरतेशेवटी कॅन्सरने नर्गिस यांचा बळी घेतला होता. आईच्या निधनाने संजयला मोठा धक्का बसला होता. संजय आईच्या खूप क्लोज होता. संजय ड्रग्जच्या आहारी गेल्याचे नर्गिस यांना सर्वात आधी कळले होते. त्या अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असताना संजयची काळजी त्यांना सतावत होती.
हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी संजयसाठी एक टेप रेकॉर्ड करुन पाठवली होती. ती टेप ऐकून संजय 4 तास नुसता रडत होता. नर्गिस यांना संजयला सिल्वर स्क्रिनवर बघायचे होते. पण दुर्दैवाने त्यांना संजयला रुपेरी पडद्यावर बघता आले नाही. कारण संजयचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ रिलीज होण्याच्या 4 दिवस आधीच त्यांचे निधन झाले होते.