संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

By गीतांजली | Published: October 24, 2020 01:41 PM2020-10-24T13:41:15+5:302020-10-24T13:50:22+5:30

अलीकडेच संजय दत्तने कॅन्सरवर मात दिली आहे.

Sanjay Dutt won the battle against cancer but still can't do 'this' work! | संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

googlenewsNext

अभिनेता संजय दत्तने कॅन्सरववर मात दिल्याने त्याचे फॅन्स सध्या खुश आहे. संजय दत्तला पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी ते आतुर आहेत. जरी संजय दत्तने कॅन्सरचा पराभव केला असला तरी त्याची तब्येत अजून म्हणावी तशी ठीक नाही. तो अ‍ॅक्शन सीन्स अजून करु शकत नाही. त्यामुळे सिनेमात बदल करावा लागतो आहे. 

संजय दत्तच्या सिनेमात होणार बदल 
आजतकच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तचा येणार सिनेमा पृथ्वीराज आणि KFG2मध्ये बदल करण्यात येणार आहेत. आधी या दोनही सिनेमात दमदार अ‍ॅक्शन सीन्स होते. ते  सीन्स करण्यासाठी तो फिजिकली फिट असण्याची आवश्यकता होती. मात्र आता असे नाही आहे, त्यामुळे सिनेमात काही आवश्यक बदल करण्यात येतील. KFG2 शिवाय संजय अक्षय कुमारसोबत पृथ्वीराजमध्ये सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात त्याला घोडेस्वारीपासून तलवारबाजीपर्यंत बरेच काही करायचे आहे.पण आता त्याची प्रकृती पाहता चित्रपटात काही बदल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत संजय दत्त मोठ्या पडद्यावर आपली भूमिका साकारताना दिसणार आहे, पण कदाचित तो अ‍ॅक्शन सीन्स करणार नाही. 

 


कॅन्सरशी लढाई जिंकली 
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. संजय दत्तने नोटमध्ये लिहिले की, 'गेले काही आठवडे मी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना देव हा सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आणि आज माझ्या मुलांच्या वाढदिवसावर मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी त्यांना आरोग्य आणि आमच्या परिवाराच्या चांगल्यासाठी हे सर्वात चांगलं गिफ्ट देऊ शकलो. हे सगळं तुमच्या विश्वासामुळे आणि सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. मी मनपासून सर्वांचा आभारी आहे. जे या कठिण काळात माझ्यासोबत उभे राहिले आणि माझी ताकद झालेत. मला इतकं प्रेम, दया आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार'.
 

Web Title: Sanjay Dutt won the battle against cancer but still can't do 'this' work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.