'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:11 IST2021-09-20T14:10:23+5:302021-09-20T14:11:05+5:30
Shah rukh khan: अभिनेता शाहरुख खानने त्याच्या गणरायाचं विसर्जन केलं. यावेळचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल
यंदा सगळीकडे मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकानेच गणरायाची मनोभावे पूजाआर्चा केली. यात अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या बाप्पाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, यामध्ये काही सेलिब्रिटींना चाहत्यांकडून कौतुकाची पोचपावती मिळाली. तर, काहींना मात्र, ट्रोल व्हावं लागलं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कश्मीरा शाह तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली होती. गणेशपूजेच्यावेळी तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला अनेकांनी खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान ट्रोल झाला आहे. इतकंच नाही तर, तुला धर्माचा विसर पडला का? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
रविवारी जड अंत:करणाने अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यात अभिनेता शाहरुख खाननेदेखील त्याच्या गणरायाचं विसर्जन केलं. यावेळचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले. मात्र, अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
'या' कालाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर
'बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा भेटेपर्यंत त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर असेच राहू दे. गणपती बाप्पा मोरया!', असं कॅप्शन देत शाहरुखने हा फोटो शेअर केला होता. परंतु, अनेकांनी त्याला धर्माची आठवण करत ट्रोल केलं.
Bigg Boss Marathi 3: 'मला डोकं आहे'; पहिल्याच दिवशी मीरा-स्नेहामध्ये वादाची ठिणगी
'तुला तुझ्या धर्माचा विसर पडला आहे का?', असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला. तर 'तू तर फार पूर्वीच तुझा धर्म बदलून टाकला आहेस', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर, 'त्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी तू तुझ्या सगळ्या मर्यादा ओलांडून टाकल्या आहेस आणि तू एक मुस्लिम आहे याचा तुला विसर पडलाय', असंही एका युजरने म्हटलं आहे.
दरम्यान, २०१८ मध्येदेखील शाहरुखने गणपतीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याचा धाकटा मुलगा अबराम गणपतीच्या पाया पडत होता. मात्र, हा फोटो पाहिल्यावरही अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं.