शाहरुखच्या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त ठरला, पुढच्या वाढदिवसाच्या आधी मोठ्या स्क्रीनवर परतण्याचे फॅन्सना दिले वचन
By गीतांजली | Updated: November 5, 2020 17:15 IST2020-11-05T17:04:13+5:302020-11-05T17:15:43+5:30
यशराज बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

शाहरुखच्या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त ठरला, पुढच्या वाढदिवसाच्या आधी मोठ्या स्क्रीनवर परतण्याचे फॅन्सना दिले वचन
अभिनेता शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे की तो त्याच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी मोठ्या स्क्रीनवर परत येईल. हे वचन पूर्ण करण्यासाठी तो या महिन्यात सेटमध्ये परत येणार आहे. हा सिनेमा आहे 'पठान'. यशराज बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. यात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण सिनेमात शाहरुखची हिरोईन असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 'पठान'चे पहिले शेड्यूल मुंबईत याच महिन्यात सुरु होणार आहे. पुढच्या वर्षी जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणची एंट्री या चित्रपटात होईल. पहिले शेड्यूल नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस सुरु होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या जूनपर्यंत सुरू राहणार असून 2021च्या अखेरीस हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊ शकेल. सिनेमाच्या कथेचा केंद्रबिंदू शाहरुख खान असणार आहे.
पठाणनंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे.शाहरुख खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात शाहरुख एका सीनिअर रॉ एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये मेकअपवर बराच भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या लूकवर या सिनेमात खूप मेहनत घेण्यात येत आहे.