शिबानी दांडेकरने मौन सोडलं, म्हणाली - रियाला मी १६ वर्षांची असतानापासून ओळखते....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:19 PM2020-09-02T15:19:05+5:302020-09-02T15:41:07+5:30
शिबानी दांडेकरने पोस्टमधे तिने लिहिले की, ती रियाला १६ वर्षाची असतानापासून ओळखते. तिला केवळ सुशांतवर प्रेम करण्याची शिक्षा मिळत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शिबानी रियासोबत दिसली होती.
(Image Credit : NBT)
अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड शिबानी दांडेकरने अखेर मौन सोडलंय. शिबानीने सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधे तिने लिहिले की, ती रियाला १६ वर्षाची असतानापासून ओळखते. तिला केवळ सुशांतवर प्रेम करण्याची शिक्षा मिळत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शिबानी रियासोबत दिसली होती.
शिबानीने लिहिले की, 'मी रिया चक्रवर्तीला तेव्हापासून ओळखते जेव्हा ती १६ वर्षांची होती. वायब्रेंट, मजबूत, जिंदादिल आणि ब्राइट स्पार्कसारखी...गेल्या काही महिन्यांपासून मी तिच्या आणि तिच्या पर्सनॅलिटीची उलट साइड बघत आहे. त्यांनी असा त्रास भोगलाय ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. आम्ही पाहिलंय मीडिया कशाप्रकारे गिधाडांप्रमाणे व्यवहार करत आहे. जसे एखाद्या शैतानाच्या शिकारीवर आहेत. एका निर्दोष कुटूंबावर आरोप लावत आहेत आणि खचून जाण्यापर्यंत त्यांना टॉर्चर करत आहेत'.
तिची चूक होती, एका मुलावर प्रेम करणं....
शिबानीने पुढे लिहिले की, 'तिच्याकडून आधारभूत मानवाधिकारही हिसकावून घेतले. कारण मीडिया तर जज, ज्यूरी आणि जल्लादाच्या भूमिकेत आहे. आपण पत्रकारितेचा मृत्यू आणि मानवतेचं भयावह रूप पाहिलंय. तिची चूक काय होती? तिने एका मुलावर प्रेम केलं. त्याच्या वाईट दिवसात त्याला साथ दिली, त्याच्यासोबत राहण्यासाठी आपलं जगणं बदललं. आणि जेव्हा त्याने फाशी लावून घेतली तेव्हा आपण काय झालो? मी स्वत: पाहिलंय की, या सर्व गोष्टींमुळे तिच्या आईची तब्येत कशी बिघडली. २० वर्षे देशाची सेवा करणाऱ्या तिच्या वडिलांवर याचा काय परिणाम झाला आहे. किती लवकर तिच्या भावाला मोठं व्हावं लागलं आणि किती मजबूत व्हावं लागलं'.
मी नेहमी तुझ्यासोबत आहे....
'माझी रिया तू ताकतवर आहे. तू जशी माणूस आहे आणि जसं तुला माहीत आहे की, सत्य तुझ्या बाजूने आहे. तू लढत आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम आणि आदर आहे. मला फार दु:खं होतंय की, तुला या सगळ्यातून जावं लागतंय. मला दु:खं आहे की, आम्ही चांगले नव्हतो. मला दु:खं आहे की, खूप लोकांनी तुला निराश केलं. तुझ्यावर संशय घेतला. जेव्हा तुला जास्त गरज होती, तुझ्यासोबत नव्हते. मला दु:खं आहे की, तू जीवनात जे सर्वात चांगलं काम केलं(सुशांतचा सांभाळ), त्याने तुला जीवनातील सर्वात वाईट अनुभव दिला. मी नेहमी तुझ्यासोबत आहे'.
'मी लढणार आणि जिंकणारही, माझे सत्यच मला देतं बळ', रियाने आरोप करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर
तापसी पन्नूनंतर विद्या बालनने केला रियाला सपोर्ट, म्हणाली - जे होतंय त्याचं वाईट वाटतंय!