सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 05:56 PM2020-08-30T17:56:11+5:302020-08-30T18:03:27+5:30

सिद्धार्थ आणि दिपेश हे दोघेही 8 ते 14 जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते.

Siddharth, Dipesh ready to be government witnesses? Likely to take a new turn in the sushant singhs death case | सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता

सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धार्थ आणि दिपेश दोघांनीही स्वतःहून सीबीआयकडे सरकारी साक्षीदार होण्याची विनंती केल्याचे समजते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सीबीआयच्या पथकाने आतापर्यंत रिया चक्रवर्ती हिच्यासह सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी, घरगुती व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, स्वयंपाकी नीरज, दिपेश सावंत, केशव यांची चौकशी केली आहे. या चौकशीत सिद्धार्थ पिठाणी आणि दिपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याची सीबीआयकडे विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे झाले तर या प्रकरणाला नवीन वळण येणार आहे. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी आणि दिपेश सावंत यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे मान्य केले आहे. सिद्धार्थ आणि दिपेश दोघांनीही स्वतःहून सीबीआयकडे सरकारी साक्षीदार होण्याची विनंती केल्याचे समजते. सिद्धार्थ आणि दिपेश हे दोघेही 8 ते 14 जूनच्या काळात सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते.

गेस्ट हाउसमधून मुख्यालयात सिद्धार्थची स्वतंत्रपणे चौकशी
शुक्रवारी सकाळपासूनच सीबीआयची टीम सिद्धार्थ पिठाणीची चौकशी करत होती. दरम्यान सीबीआयने सिद्धार्थला डीआरडीओ गेस्ट हाउसमधून बाहेर काढून मुंबईतील सीबीआयच्या मुख्यालयात नेले. डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये कमी खोल्या असल्यामुळे सिद्धार्थची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी त्याला मुख्यालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

तीन ते चार अज्ञात लोकांचीही चौकशी
सीबीआय मुख्यालयात यापूर्वी तीन ते चार अज्ञात व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी सीबीआयच्या मुख्यालयात दिपेश सावंतही उपस्थित होता. दरम्यान, दिपेश आणि सिद्धार्थ या दोघांनाही सरकारी साक्षीदार करण्याआधी सीबीआयला आवश्यक ती कागदपत्रांची जुळवा जुळव करावी लागेल. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास होईल.

रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!
गेल्या 5 वर्षांत सुशांतच्या खात्यामध्ये 70 कोटी रूपये होते, असा खुलासा सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिटमधून झाला आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल ईडी आणि सीबीआयकडे सोपवला आहे. ग्रांट थॉर्टन या कंपनीच्या ऑडिट अहवालानुसार सुशांत रिया आणि तिच्या कुटुंबावर पैशांची उधळपट्टी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झालेले नाही.

कुठे खर्च झालेत 70 कोटी?
गेल्या 5 वर्षात सुशांतच्या खात्यामध्ये 70 कोटी रुपये होते. त्यातील बरीच रक्कम खर्च झाली आहे. 70 कोटींपैकी मोठी रक्कम संपत्ती, लक्झरी कार आणि बाईक खरेदी करण्यासाठी वापरली गेली. अपार्टमेंटचे भाड्यासाठी देखील बराच पैसे खर्च झाला. सुशांतने कोट्यवधी रुपये एफडी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले. शिवाय एक मोठी रक्कम सुशांतने केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देखील दान दिली होती. या ऑडिट अहवालानुसार सुशांतच्या बँक खात्यातील जवळपास 50 लाख रुपये रिया आणि तिच्या भावासाठी खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये युरोप टूर, शॉपिंग, स्पा, हॉटेल आणि तिकीट बूकिंगचा समावेश आहे. मात्र सुशांतकडून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण झाले नाही.

आणखी बातम्या...

- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

Web Title: Siddharth, Dipesh ready to be government witnesses? Likely to take a new turn in the sushant singhs death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.