...तर बॉलिवूड पुन्हा बहरेल; 'द कश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांनी सांगितला 'सिम्पल फॉर्म्युला'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 06:49 PM2022-09-24T18:49:08+5:302022-09-24T18:49:56+5:30
Vivek Agnihotri : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडबाबत आपलं मत व्यक्त करत बॉलिवूडला वाचवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे.
२०२२ मध्ये एकापाठोपाठ एक बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज झाले आहेत, परंतु बॉक्स ऑफिसवर बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हा काळ काही खास नाही. गेल्या काही वर्षांत अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होताच कोसळले आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात आहे, या चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी त्यावर बहिष्कार टाकला जात आहे. या सगळ्यात आता 'द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files)चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडबाबत आपलं वक्तव्य करत बॉलिवूडला वाचवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे.
'द काश्मीर फाइल्स'पासून विवेक अग्निहोत्री आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत येत असतात. ते अनेकदा बॉलिवूडमधील अनेकांवर निशाणा साधताना दिसतात. २३ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय सिनेमा दिना'च्या दिवशी देशातील बहुतांश सिनेमागृहांमध्ये तिकिटाची किंमत ७५ रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वच चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. आता विवेक अग्निहोत्री यांनी एका ट्रेड अॅनालिस्टच्या ट्विटवर व्यंगात्मक पद्धतीने बॉलिवूडची सद्यस्थिती सुधारण्याबाबत आपले मत मांडले आहे.
1. Less price. Less arrogance. Less star fees. Less wastage on PR & airport looks.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 23, 2022
2. More research. More content. More Bharat.
Simple solution for Bollywood’s resurrection. https://t.co/0317SpQYai
विवेक अग्निहोत्रीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि लिहिले - कमी किंमत. कमी अहंकार. कमी स्टार फी. पीआर आणि विमानतळाच्या देखाव्यावर वायफळ खर्च. दुसरा फॉर्म्युला स्पष्ट करताना त्यांनी लिहिले – जास्त संशोधन, जास्त सामग्री, जास्त भारत. बॉलिवूड पुन्हा बहरण्यासाठी सोपे मार्ग.
विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी मी कोणाच्याही विरोधात नसल्याचे म्हटले होते. मला फक्त फिल्म इंडस्ट्री सुधारायची आहे. हा बनावट धंद्याचा गरम हवेचा फुगा आहे, जो आता फुटला आहे. आता कलाकार आणि जनसंपर्क मोहिमेपासून दूर कथा, लेखन आणि दिग्दर्शनाकडे लक्ष वळवले पाहिजे.