सोनू सूदच्या मनाचा मोठेपणा: चमोली दुर्घटनेत अनाथ झालेल्या कुटुंबांना दिला आधार, चार मुलांना घेतले दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:42 AM2021-02-20T11:42:01+5:302021-02-20T11:48:18+5:30

चमोली दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने टिहरी जिल्ह्यातील दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच इतरांनाही मदतीसाठी पुढे यावे, अनेकांना आधार द्यावा असा आवाहनही सोनूने यावेळी नागरिकांना केले आहे.

Sonu Sood Adopts Four Daughters Of Late Electrician | सोनू सूदच्या मनाचा मोठेपणा: चमोली दुर्घटनेत अनाथ झालेल्या कुटुंबांना दिला आधार, चार मुलांना घेतले दत्तक

सोनू सूदच्या मनाचा मोठेपणा: चमोली दुर्घटनेत अनाथ झालेल्या कुटुंबांना दिला आधार, चार मुलांना घेतले दत्तक

googlenewsNext

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत म्हणून पुढे आला. अनेक गरजू लोकांना त्याने मदतीचा हात दिला. कशाचीही पर्वा न करता त्याने लोकांना भरभरून मदत केली. आजही त्याचे हे मदतकार्य सुरुच आहे. लॉकडाऊननंतर अनेक गरजु लोकांनी सोनू सूदकडेच मदत मागत आपल्या समस्या सोडवल्या आहेत. ज्यावेळी कोणी मदत करत नव्हते, अशावेळी तो सर्वांच्या मदतीला धावून आला, त्यांच्या या चांगल्या कामामुळे आम्ही त्याला आज लोक देवाचे स्थान देत त्याची मनोभावे पूजाही करतात.

कोरोनाकाळात गरजू लोकांना मदत करणारा सोनू सूद  उत्तराखंडच्या चमोली दुर्घनतेत पिडीत कुटूंबाचा आधार बनला आहे. चमोलीवर ओढावलेल्या संकटात अनेकजण जीवन-मृत्यूशी लढा देत आहेत. चमोली दुर्घननेमुळे अस्वस्थ झालेल्या सोनूने  टिहरी जिल्ह्यातील  दोगी पट्टीच्या एका पिडीत कुटूंबातल्या चार मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच इतरांनाही मदतीसाठी पुढे यावे, अनेकांना आधार द्यावा असा आवाहनही सोनूने यावेळी नागरिकांना केले आहे.

 45 वर्षांचे आलम सिंह विष्णुगड जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित रितविक कंपनीत इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होते. पुराच्या दिवशी आलम सिंग प्रकल्पातील बोगद्यात कामाला गेले होते, पण त्यानंतर ते परतलेच नाही. दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेच्या आठ दिवसांनंतर ढिगा-याखाली त्यांचा मृतदेह सापडला, या दुर्घटनेनंतर आलम सिंहच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आलम सिंह यांच्यावरच होती. कुटुंबाचा आधार असेलेल्या आलम सिंहच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर आहे. आलम यांना लहान चार मुलं आहे. आंचल (14), अंतरा (11), काजल (08) आणि दोन वर्षांची अनन्या या मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा आधार बनत सोनू सूद पुन्हा एकदा देवदूत बनत पुढे आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिने अभिनेता सोनू सूद यांनी दिवंगत आलम सिंगच्या चार मुलांना दत्तक घेण्याचे आश्वासन दिले आहे. सिने अभिनेता चमूने मुंबईतील चारही मुलांना दत्तक घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान, काही सामाजिक संस्थांनीही कुटुंबाची परिस्थिती पाहता मदतीचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Sonu Sood Adopts Four Daughters Of Late Electrician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.