आई शप्पथ...म्हणत चाहत्याने मागितला स्मार्टफोन, सोनू सूदने असे दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 10:48 AM2021-02-28T10:48:04+5:302021-02-28T10:48:22+5:30
सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक त्याच्याकडे अशा मागणी करतात की, सोनूही कपाळावर हात मारून घेतो.
कोरोना महामारीत सुरु झालेला सोनू सूदचा मदतगार म्हणूनचा प्रवास अद्यापही सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये हजारो स्थलांतरित मजुरांसाठी दिवसरात्र खपणारा अभिनेता सोनू सूद अजून थकलेला नाही. लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरत असल्याने, लोकंही त्याच्याकडूनच अपेक्षा करत आहेत. पण काही लोकांच्या इतक्या विचित्र असतात की, स्वत: सोनू सूदलाही हसावे की रडावे हे कळत नसावे. अलीकडे एका चाहत्याने अशीच एक विचित्र डिमांड केली.
या फॅनने सोनू सूदला ट्वीट केले. या चाहत्याने सोनूकडे महागड्या फोनची डिमांड केली आणि त्याची डिमांड ऐकून सोनूने त्याला अतिशय मजेदार उत्तर दिले.
मां की कसम खाकर किसी की मदद कर दे भाई,
— sonu sood (@SonuSood) February 27, 2021
मां ज्यादा दुआएं देगी।
फोन तो सबके पास है।
दुआएं किसी किसी के पास। https://t.co/Q7l3zV3cWL
‘आमचा सुपर हिरो, रिअल सुपरहिरो. सोनू सूदजी मी माझ्या मित्रांसमोर आईची शपथ घेऊन सॅमसंग एफ 62 घेईन, असे म्हटले होते. पण घेऊ शकत नाहीये. आईची शपथ व्यर्थ जाऊ नये, याच चिंतेत आहे. तुम्ही काही मदत करू शकता का?,’ असे या चाहत्याने लिहिले. सोनूच्या नजरेतून चाहत्याचे हे ट्वीट सुटले नाही. त्याने लगेच त्याला उत्तर दिले.
‘मां की कसम खाकर किसी की मदत कर दे भाई, मां ज्यादा दुआएं देगी. फाने तो सबके पास है, दुआएं किसी किसी के पास...,’ असे सोनूने या चाहत्यासाठी लिहिले.
सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक लहानमोठ्या समस्या, अडचणी त्याला सांगतात. कधी कधी तर लोक सोनू सूदकडे अशा मागणी करतात की, सोनूही कपाळावर हात मारून घेतो. अलीकडे एका गावातील काही ग्रामस्थांनी सोनूकडे गावातील वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ट्विटरवरुन केली होती. बासु गुप्ता नामक ट्विटर युजरने सोनूकडे गावाची कैफियत मांडली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी सोनूनेही ती कैफियत गंभीरतेने घेत, गावातील वानरांना पकडून दिले होते.