'सुपरहिरो' सोनू सूदने हैदराबादमध्ये शूटींगला केली सुरूवात, सेटवर लोकांचं प्रेम पाहून भारावला...
By अमित इंगोले | Published: October 3, 2020 12:18 PM2020-10-03T12:18:00+5:302020-10-03T12:21:04+5:30
सोनू बऱ्याच महिन्यांनी आता कामावर परतला आहे. तो हैदराबादमध्ये शूटींगसाठी पोहोचलाय. त्याने सांगितले की, आधीच्या तुलनेत लोकांच्या व्यवहारात बराच बदल बघायला मिळतोय.
सोनू सूद कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांसाठी देवदूत बनला. गेल्या सहा महिन्यात सोनूने मोजताही येणार नाही इतक्या लोकांची मदत केली. अजूनही त्याचं लोकांना मदत करण्याचं काम सुरूच आहे. अशात सोनू बऱ्याच महिन्यांनी आता कामावर परतला आहे. तो हैदराबादमध्ये शूटींगसाठी पोहोचलाय. त्याने सांगितले की, आधीच्या तुलनेत लोकांच्या व्यवहारात बराच बदल बघायला मिळतोय.
सोनू सूदने गेल्या ६ महिन्यात मुंबईहून घरी पसरतणाऱ्या प्रवासी मजुरांसोबतच अनेक गरजू लोकांची मदत केली. तो सध्या तेलुगू सिनेमा Kandirega चं शूटींग करण्यासाठी हैदराबादमध्ये आहे. नॅशनल हेराल्डच्या रिपोर्टनुसार, सोनूने सांगितले की, त्याला खूप वेगळं वाटत आहे. हैदराबादच्या सेटवर जादुई वातावरण आहे. ज्याप्रकारे कास्ट आणि क्रूने माझं स्वागत केलं...ते फार भावूक करणारं होतं. लोक सतत मला सेटवर भेटण्यासाठी येत आहेत. केवळ हैदराबादच नाही तर दुसऱ्या शहरांमधूनही लोक येत आहेत.
सोनूने सांगितले की, आपल्या कामामुळे संपूर्ण देशातील लोकांच्या संपर्कात येणं, त्यांचं प्रेम मिळणं आणि आदर करणं फार चांगलं वाटत आहे. सगळं काही एकदम बदललं आहे. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफर म्हणाला की, सिनेमाचं बॉक्स ऑफिस वेगळं असेल. मी स्वत:ला नसीबवान मानतो की, मी गरजू लोकांची मदत करू शकलो. एका अभिनेता म्हणून माझ्या नावाने लोकांची मदत केली. आता लोकांची मदत मला एक अभिनेता म्हणून मदत करेल.
दरम्यान, सोनू सूदच्या कामाची दखल यूएनने सुद्धा घेतली. त्याला नुकतेच यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून एसडीजी स्पेशल ह्युमॅनिटेरियन अॅक्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २९ सप्टेंबरला एका व्हर्चुअल सेरेमनीमध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला. याबाबत सोनू सूद म्हणाला की, हा एक मोठा सन्मान आहे. यूएनकडून सन्मान मिळणं खास आहे.