90 टक्के bollywood ड्रग्स घेत नाही, 'बॉयकॉट' टॅग दूर करा; सुनील शेट्टीची योगींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:18 AM2023-01-06T09:18:08+5:302023-01-06T09:18:53+5:30
९० टक्के बॉलिवुड ड्रग्स घेत नाही. ते फक्त मेहनतीने आपले काम करतात. बॉलिवुडवर घोंघावत असलेलं बॉयकॉटचं सावट दूर करावं.
Bollywood : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. उत्तर प्रदेशमध्ये उद्योग वाढावेत, फिल्म सिटी तयार व्हावी, हा मुख्य उद्देश या दौऱ्याचा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान योगी आदित्यानाथ यांची बॉलिवुडच्या अनेक मंडळींनी भेट घेतली. सिनेमा, उत्तर प्रदेश फिल्म सिटी प्रोजेक्ट अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने देखील योगींची भेट घेतली. सिनेमा जगतात सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवर त्याने योगींशी चर्चा केली.
बॉयकॉट ट्रेंड आणि ड्रग्स चा मुद्दा
काल ५ जानेवारी रोजी योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवुड स्टार्स, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी फिल्म सिटी बाबत चर्चा केली. या चर्चेत सुभाष घई, सुनील शेट्टी, कैलाश खेर, जॅकी श्रॉफ, सोनू निगम, रविकिशन आणि बोनी कपूर सह अनेक कलाकार मंडळींचा सहभाग होता. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीने ड्रग्स आणि बॉयकॉट हा मुद्दा काढला.
सुनील शेट्टी म्हणाला, '९० टक्के बॉलिवुड ड्रग्स घेत नाही. ते फक्त मेहनतीने आपले काम करतात. बॉलिवुडवर घोंघावत असलेलं बॉयकॉटचं सावट दूर करावं.जेणेकरुन बॉलिवुडची ढासळलेली प्रतिमा परत येईल. बॉयकॉट या टॅग ला दूर करणे गरजेचे आहे. एखादा आंवा सडलेला असू शकतो पण म्हणून सगळेच असे नसतात. चित्रपट, संगीत यांचं जगाशी खास नातं असतं. यामुळे हा टॅग दूर केला पाहिजे. हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवावा ही विनंती.'
आज मुंबई में फिल्म जगत से जुड़े लोगों के साथ 'नए उत्तर प्रदेश' में फिल्म क्षेत्र से संबंधित विभिन्न बिंदुओं पर सार्थक चर्चा हुई।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 5, 2023
सभी का हृदय से धन्यवाद! pic.twitter.com/oiFsGKsfFC
याचवेळी चर्चेत सहभागी असलेले निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर म्हणाले, फिल्म इंडस्ट्रीसाठी मुंबईत काम करणे सहज सोपे आहे. तुम्ही उत्तर प्रदेशला क्राईम फ्री बनवले आहे. त्यामुळे आता तिथेही शूटिंग करण्यात काही अडचण नाही. मी उत्तर प्रदेशमध्ये २ सिनेमांचे शूट केले आहे. यापुढे आणखी शूट करण्याचाही प्लॅन आहे.
सिनेदिग्दर्शक सुभाष घई म्हणाले, 'तुम्ही पायाभूत सुविधांबाबत बोलत आहात ही चांगली गोष्ट आहे. पण अभिनयाचं योग्य शिक्षण मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरुन भविष्यात उत्तर प्रदेशमध्ये बाहेरुन टॅलेंट बोलवण्याची गरज पडणार नाही.' तर कैलाश खेर यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक आध्यात्मिक केंद्रही सुरु करण्याची मागणी केली.