'सीमा हैदर हिच...'; पाकिस्तानातून आलेल्या महिलेबाबत 'गदर'च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 03:03 PM2023-07-14T15:03:33+5:302023-07-14T15:05:50+5:30
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला 'गदर'च्या दिग्दर्शकाने म्हटलं तारा सिंग, म्हणाले...
प्रेमासाठी बॉर्डर पार करुन भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सीमाला तिच्या भारतातील बॉयफ्रेंडबरोबर लग्न करुन संसार थाटायचा आहे. सीमाची कथा ऐकून अनेकांना सुपरहिट ठरलेल्या बॉलिवूडमधील गदर या चित्रपटाची आठवण झाली. 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सीमा हैदर प्रकरणावर भाष्य केलं आहे.
'गदर'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गदर २च्या निमित्ताने अनिल शर्मा यांनी आजतकला मुलाखत दिली. ते म्हणाले, "प्रेमाला कोणतीच सीमा नसते. माझा चित्रपट 'गदर'ची कथाही अशीच आहे. मी सीमाची कहाणी ऐकली. ती मुलगी खूप बहादूर आहे. प्रेमासाठी ती पाकिस्तानाहून भारतात आली. तो मुलगाही सीमाला तिच्या मुलांसह स्वीकारायला तयार आहे. तिचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांची प्रेमकहाणी यशस्वी होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन."
बाईपण खरंच भारी बाबा! सिनेमासाठी महिलांनी केला ४५ किमीचा प्रवास
"भारतातील लोक परकीयांनाही आपलंसं करुन घेतात. मी त्या मुलीला तारा सिंगचा फिमेल व्हर्जन म्हणेन. ती मुलगी फार हिमती आहे. तिने कोणाचीही पर्वा केली नाही. ही सोपी गोष्ट नाही. समाज व सिनेमा नेहमी एकमेकांना पूरक राहिलेले आहेत. चित्रपटांचा प्रभाव समाजावर पडतो. त्यांना चित्रपट पाहून प्रेम झालं असेल, असं मी म्हणत नाही. त्यांना प्रेम झालं असेल आणि कदाचित नंतर त्यांना चित्रपट पाहून हिंमत मिळाली असेल. तारा सिंगने केलं तर आपणही करू शकतो, असं तिला वाटलं असेल," असंही पुढे ते म्हणाले.
Alia Bhatt: ...अन् आलियाने उचलली पापाराझीची चप्पल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
"सीमा हैदर आणि तिच्या कुटुंबीयांना गदर २ ची तिकिटे फ्रीमध्ये उपलब्ध करुन द्यावी, असे मेसेज मला येत आहेत. 'गदर २' प्रदर्शित होण्याआधी सीमा व तिच्या कुटुंबीयांना दाखवा, असे मेसेजही आले आहेत. मी आमच्या टीमबरोबर यासाठी प्लॅनिंग करत आहे. जर सगळं काही नीट झालं तर नक्कीच आम्ही त्यांना फ्रीमध्ये चित्रपट दाखवू," असं अनिल शर्मा यांनी सांगितलं. दरम्यान, सनी देओल आणि अमीशा पटेल मुख्य भूमिकेत असलेला गदर २ येत्या ११ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.