माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:46 PM2020-08-27T14:46:04+5:302020-08-27T14:46:32+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय. त्यात आता रियाने सुशांतबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

Sushant had gone to Thailand with six children before me, living the way he wanted to: Rhea | माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया

माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रियाच्या विरोधात पाटणा येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी त्यांनी तिच्यावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याचे पैसे उकळल्याचा आणि कुटुंबापासून दूर केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान रियाने नुकतेच तिच्यावर केलेल्या आरोपांवरील चुप्पी तोडली आहे. तिने सुशांतबाबत बरेच खुलासे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.


सुशांत आणि रिया व तिच्या भावासोबत युरोप ट्रिपला गेले होते. या ट्रिपचा संपूर्ण खर्च सुशांतने केला होता. त्यावरून रिया सुशांतच्या पैशांवर जगत होती, असे आरोप करण्यात आले होते. त्यावर आता रियाने आज तकला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली की, पॅरिसमध्ये माझे एक शूट होते एका कंपनीसोबत. शियन. जी एक कपड्याची कंपनी आहे ज्याचा एक फॅशन शो होता. त्याचे चॅट माझ्याकडे आहेत. सर्व प्रुफ माझ्याकडे आहेत. तो फॅशन शो अटेंड करण्यासाठी मला पॅरिसला बोलवण्यात आले होते. माझे तिकिट बिझनेस क्लास आणि हॉटेलची तिकिटं बुक होती. पण सुशांतने विचार केला ही यात युरोप ट्रिप करूयात. त्याने ती तिकिटं रद्द केली. जी माझ्याकडे आहेत जर सिद्ध करावे लागले तर. त्याने ते तिकिटं कॅन्सल केली आणि फर्स्ट क्लासची तिकिटं बुक केली आणि इतर ट्रिपवरदेखील त्याने हॉटेलचे बिल भरले. त्याला असे करायचे होते आणि मला त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मला चिंता ही होती की खूप मोठी ट्रीप आहे. खूप जास्त पैसे खर्च होत आहेत. पण तो असाच किंग साइज जीवन जगत होता.


ती पुढे म्हणाली की, यापूर्वी देखील तो सहा मुलांसोबत थायलंड ट्रिपवर गेला होता. जिथे त्याने 70 लाख रुपये खर्च केले आहेत आणि एक प्रायव्हेट जेट घेऊन गेला होता. ही सुशांतची लाइफस्टाइल चॉइसेज होती. त्याला कसेही करून त्याचे जीवन जगायचे आहे. त्यात त्याला सांगणारे तुम्ही कोण होता की त्याने कसे जगले पाहिजे. त्याला फाइव्ह स्टारमध्ये राहिले पाहिजे आणि गर्लफ्रेंडला सोबत नेले पाहिजे की नाही. त्यात त्याची मर्जी. तो मुलांनादेखील ट्रीपवर घेऊन गेला होता. त्यांनीदेखील सुशांतला बळजबरी केली होती का असे करण्यासाठी?

आणि हा मी सुशांत सिंग राजपूतच्या पैशांवर जगत नव्हती. आम्ही एका कपल सारखे राहत होतो.
   

Web Title: Sushant had gone to Thailand with six children before me, living the way he wanted to: Rhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.