Sushant Singh Rajput Case : ...म्हणून सुशांत घेत होता औषध, रियाने उघड केलं यूरोप ट्रिपचं आणखी एक गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 10:37 AM2020-08-27T10:37:06+5:302020-08-27T10:37:16+5:30
सीबीआय तपास करत असल्यापासून सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये रोज नव्याने खुलासे होत आहे. अशातच आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे.
सीबीआय तपास करत असल्यापासून सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये रोज नव्याने खुलासे होत आहे. अशातच आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियावर आता ड्रग्ससंबंधी आरोप लावले जाात आहे. तसे पुरावे तिच्या चॅटींगमधून मिळाले आहेत. त्यामुळे या केसमध्ये एक वेगळं वळण आलं आहे.
आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.
रिया चक्रवर्ती म्हणाली की, आम्ही पॅरिसमध्ये लॅंड झालो. त्यानंतर तीन दिवस सुशांत रूममधून बाहेर निघाला नाही. कारण जाण्याआधी तो खूप आनंदी होता. त्याला त्याचा वेगळा अंदाज दाखवायचा होता. पण पॅरिसला पोहोचल्यावर तो रूममधून बाहेरच आला नाही. पण स्वित्झर्लॅंड पोहोचलो तर तो आनंदी होता. इटलीला पोहोचलो तेव्हा आमच्या रूममध्ये एक वेगळंच स्ट्रक्चर होतं.
रियाने सांगितले की, रूममध्ये मला भीती वाटत होती. पण सुशांत म्हणाला होता सगळं ठिक आहे. रिया म्हणाली, सुशांत बोलला होता की, इथे काहीतरी आहे. पण मी म्हणाले होते की, हे एक वाईट स्वप्न ठरू शकतं. त्यानंतर सुशांतची हालत बिघडली आणि तो रूममधून बाहेर आलाच नाही.
रियाने मुलाखतीत सांगितले की, २०१३ मध्ये त्याच्यासोबत काहीतरी झाले होते. तेव्हा त्याच्यासोबत डिप्रेशनसारखी काही गोष्ट झाली होती. त्यावेळी मानसोपचारतज्ज्ञांना भेटला होता. त्यांचं नाव हरेश शेट्टी आहे. त्यांनीच औषधाबाबत सांगितलं होतं.
हे पण वाचा :
अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती एनसीबीच्या चौकशीचा फास; ड्रग तस्करीचे कनेक्शन तपासणार
Sushant Singh Rajput Suicide : रियाच्या अडचणीत आणखी वाढ, NCB ने दाखल केला FIR
CBD आणि MDMA म्हणजे काय? रिया चक्रवर्तीच्या चॅटमध्ये या दोन ड्रग्सचा अस्पष्ट उल्लेख, जाणून घ्या