हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:17 PM2020-09-10T16:17:54+5:302020-09-10T16:32:15+5:30

ती तुझ्यापेक्षा जास्त फेमस, तुझी काय ओळख? अंकिताच्या चाहत्यांनी शिबानीला सुनावले

sushant singh rajput case shibani dandekar slams ankita lokhande, fans gets angry | हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने ट्विटरवर लांबलचक मेसेज लिहून रियावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केलीय. रियाच्या अटकेनंतर सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रियाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता.
सुशांत आजारी होता तर अशास्थितीत त्याला रोखण्याऐवजी तू त्याच्यासाठी ड्रग्ज कशी मागवू शकतेस? असा सवाल अंकिताने रियाला केला होता. अंकिताच्या या प्रश्नाला रिया नाही पण तिची मैत्रिण शिबानी दांडेकरने उत्तर दिले आहे.

शिबानी म्हणाली, अंकिताला केवळ प्रसिद्धी हवी
अंकिता लोखंडेने काल रात्री पोस्ट केलेल्या विचित्र लेटरचे उत्तर, असे लिहित शिबानीने अंकितावर जोरदार हल्ला चढवला.
‘ही महिला केवळ 2 सेकंदाची सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे करतेय. प्रसिद्धीसाठीच ती रियाला सतत लक्ष्य करतेय. कारण ती स्वत: सुशांतसोबतच्या तिच्या नात्यातील अडचणींवर मात करू शकली नव्हती, असे शिबानी म्हणाली.

सुशांत रियावर प्रेम करायचा
शिबानीने पुढे लिहिले, ‘या पुरूषप्रधान व्यवस्थेला ओळखण्याऐवजी अंकितासारख्या महिला या व्यवस्थेच्या लाटेवर स्वार होऊन स्वत:चा अजेंडा पुढे नेत आहे. सुशांत रियावर प्रेम करायचा, हे अंकिताने स्वीकारायला हवे.’

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य


शिबानीने याआधीही केले होते रियाचे समर्थन
काही दिवसांपूर्वी विद्या बालन, तापसी पन्नू या अभिनेत्रींनी रियाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिबानी दांडेकर रियाला सपोर्ट करताना दिसली होती. शिबानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत रियाला पाठिंबा दिला होता़. रियाने सुशांतवर प्रेम केले याचीच तिला शिक्षा मिळतेय, अशी ती म्हणाली होती.
‘रिया १६ वर्षांची असल्यापासून मी तिला ओळखते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मी तिची आणि तिच्या कुटुंबाची एक नवीनच बाजू पाहते. ज्याचा आपण विचार करु शकत नाही अशा गोष्टी, त्रास ते सहन करत आहेत. प्रसारमाध्यमे कशाप्रकारे त्यांच्यासोबत वागत आहेत हे दिसून येतेय. एका निरपराध कुटुंबावर आरोप करण्यात येत आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होईल इथपर्यंत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे,’ असे शिबानी म्हणाली होती.

अंकिताचे चाहते भडकले

शिबानीने अंकिताला लक्ष्य करताच अंकिताचे चाहते भडकले. त्यांनी शिबानी दांडेकरला चांगलेच फैलावर घेतले. अंकिता तुझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. 50 वर्षांच्या फरहान अख्तरची गर्लफ्रेन्ड असण्याव्यतिरिक्त तुझी काहीही ओळख नाही. कदाचित तुच पब्लिसिटीसाठी अंकिताला लक्ष्य करतेय, अशा शब्दांत अंकिताच्या एका चाहत्याने शिबानीला सुनावले.


एका युजरने थेट फॉलोअर्सच्या संख्येचा स्क्रिनशॉट शेअर करत, शिबानीला टोला लगावला. अंकिता व तुझे स्वत:चे फॉलोअर्स बघ. कोणाला पब्लिसिटीची गरज आहे, हे यावरून स्पष्ट आहे, अशा शब्दांत एका युजरने शिबानीला सुनावले.

अंकिता या पोस्टवरून झाला शिबानीचा जळफळाट

सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने ट्विटरवर लांबलचक मेसेज लिहून रियावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘डिअर हेटर्स, थोडे लवकर जर तुमचे डोळे उघडले असते तर सुशांतला ड्रग्ज घेण्याच्या कृतीचे  समर्थन करू नये असा सल्ला तिला तुम्ही दिला असता. तिला त्याच्या मानसिक स्थितीबाबत पूर्णपणे माहिती असताना आणि तो नैराश्यात होता हे ती जाहिरपणे ओरडून सांगत असताना, तिने एका नैराश्यग्रस्त व्यक्तीला ड्रग्ज करण्याची परवानगी द्यावी का? ही कसली त्याची मदत झाली, असा सवाल अंकिताने या पोस्टमध्ये केला आहे.

 

Web Title: sushant singh rajput case shibani dandekar slams ankita lokhande, fans gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.