फक्त डिप्रेशन नाही तर ‘या’ कारणामुळे सुशांत सिंग राजपूतने केले सुसाइड?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:08 PM2020-06-15T15:08:10+5:302020-06-15T15:08:58+5:30
पोलिसांच्या चौकशीतून समोर आली नवी माहिती
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर सर्वांच्याच मनात वेगवेगळे प्रश्न आहे. सुशांतसारखा मस्तमौला अभिनेता आत्महत्या करेन, यावर बॉलिवूडच्या अनेकांना विश्वास ठेवणे कठीण जातेय. अद्याप सुशांतच्या आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि याचमुळे त्याने मृत्यूला कवटाळले, असे मानले जात आहे़ मात्र आता एक वेगळी माहिती समोर येतेय. होय, सुशांतच्या आत्महत्येचे कारण केवळ डिप्रेशन नाही तर प्रेमप्रकरण असल्याचे कळतेय.
होय, सुशांत डिप्रेशनवर उपचार घेत होता. मात्र त्याच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून त्याने डिप्रेशनवरील औषधं घेणे बंद केले होते. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची गर्लफ्रेंण्ड मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेमधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र या दोघांनीही फोन उचलला नाही. रविवारी दुपारी 12 वाजता महेश शेट्टीने सुशांतला कॉल बॅक केला. मात्र तोपर्यंत सुशांत या जगातून गेला होता.
सुशांतच्या जवळच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांशी फोनवरून चर्चा केली होती. सुशांतने नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याचे मान्य केले होते. सूत्रांचे मानाल तर, सुशांत आणि रिया यांचे लग्न होणार होते. सुशांत लग्नासाठी तयार होता. मात्र कदाचित रिया या लग्नासाठी राजी नव्हती.
लग्नावरून या दोघांमध्ये मतभेद होते. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतच्या घरी होती, मात्र त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी शिफ्ट झाली होती. या काळात रिया-सुशांत यांच्या दुरावा आल्याचेही बोलले जात आहे. सुशांतने या काळात अनेक वेळा रियाला फोन केला, मात्र तिने फोन उचलला नाही. यामुळे सुशांत तणावात होता. यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.