Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला घेतले जाऊ शकते ताब्यात, वकिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:07 PM2020-08-21T18:07:05+5:302020-08-21T18:16:28+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे.

Sushant singh rajput death girlfriend rhea chakraborty likely to be taken in custody says actor family lawyer | Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला घेतले जाऊ शकते ताब्यात, वकिलांचा दावा

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला घेतले जाऊ शकते ताब्यात, वकिलांचा दावा

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याचे वकील विकास सिंग म्हणाले की, रियाला ताब्यात घेतलं जाऊ शकते. व्यावसायिक वैर देखील तपासले जाईल.आम्ही ते सोडलेले नाही.आम्ही यावर जास्त जोर दिला नाही कारण आमच्याकडे याबद्दल थेट माहिती नाही.

विकास यांना जेव्हा विचारण्यात आले की, रियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल का ? त्यावर ते म्हणाले, शक्यता आहे की रियाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकते. 

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटींग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. तसेच रिया आणि महेश भट्ट यांच्यातील चॅटींग याकडेही इशारा करतं की, रिया चौकशीत पोलिसांना सगळं काही स्पष्ट सांगत नाहीये. अशीही चर्चा आहे की, रिया पोलिसांसोबत खोटं बोलत आहे.

८ जून रोजी सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला होता की, 'आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलणं झाल्यावर माझे डोळे उघडले गेले. तुम्ही माझे एंजल आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि आजही आहात'. एका दुसऱ्या मेसेजमध्ये रियाने लिहिले की, 'तुम्ही मला पुन्हा आझाद केलंय, तुम्ही माझ्या आयुष्यात देवासारखे आहात. तेच महेश भट्ट यांनी उत्तर दिलं की, आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडिलांना माझ्याकडून प्रेम दे. आता ते फार आनंदी होतील'.

Web Title: Sushant singh rajput death girlfriend rhea chakraborty likely to be taken in custody says actor family lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.