सुशांतचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते, मला भेटण्यापूर्वी पाच वर्षे त्यांना तो भेटलाच नाही, रियाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:12 PM2020-08-28T15:12:41+5:302020-08-28T15:12:59+5:30
सुशांतने कुटुंबियां विषयी फारशी माहिती रियाला दिली नव्हती. त्याआधी जानेवारीत तो चंदिगडला आपल्या बहिणीला भेटायला गेला होता, पण दोन दिवसांत तेथून परत आला होता.
सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वीच रियाला तिच्या घरी जायला सांगितले होते. त्या दरम्यान सुशांत 8 जून ते 13 जून या काळात त्याची बहीण मितूबरोबर होता. सुशांतची बहिण मुंबईतच राहते हे रियाला नुकतेच कळाले होते. सुशांतने कुटुंबियां विषयी फारशी माहिती रियाला दिली नव्हती. त्याआधी जानेवारीत तो चंदिगडला आपल्या बहिणीला भेटायला गेला होता, पण दोन दिवसांत तेथून परत आला होता. तिथे नेमके काय घडले माहिती नाही. कदाचित त्याचे मन रमले नसावे. तो परत का आला याबाबत मला सुशांतने सांगितले नाही.
सुशांतचे कुटुंबासोबत फारसे चांगले संबध नव्हते. त्याच्या वडिलांसोबतही सुशांतचे चांगले नाते नव्हते. मला भेटल्यानंतर सुशांत कधीच त्याच्या वडिलांना भेटला नाही. पाच वर्ष तो त्याच्या वडिलांना भेटला नसल्याचे रियाने सांगितले आहे. वडिलांनी त्याला लहान वयातच सोडले होते. त्याला याबद्दल खूप वाईट वाटायचे. (Also Read: 'तेव्हा सुशांतला कोणतेच डिप्रेशन नव्हते', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीच्या दाव्यांवर दिले सडेतोड उत्तर)
सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळ होता.सुशांत लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून गेली. सुशांत नेहमी आईची आठवण काढायचा. आई विना राहणे सुशांतला अवघड जात होते.
सुशांतवर मनापासून प्रेम करणे ही एकच चूक असल्याचे रियाने या मुलाखतीत म्हटले आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कुणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही ती म्हणाली.