एक्स मॅनेजर दिशाच्या सुसाइडच्या वृत्ताने हादरला होता सुशांत आणि नंतर स्वतःच उचलले हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:40 PM2020-06-14T15:40:18+5:302020-06-14T15:41:10+5:30
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त वाचून बॉलिवूडमधील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसला आहे.
सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. तिच्या या वृत्तानंतर सगळीकडे खूप खळबळ माजली होती. तिच्या सुसाइडचे कारण अद्याप समोर आले नाही. तिच्या आत्महत्येनंतर सुशांतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिशाला श्रद्धांजली देखील वाहिली होती. त्यानंतर आता अभिनेता सुशांत सिंग राजपूतने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त वाचून बॉलिवूडमधील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसला आहे. अद्याप सुशांतने हे टोकाचे पाउल का उचलले, हे समजू शकलेले नाही.
सुशांत सिंग राजपूतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिशाच्या आत्महत्येचे निधन झाल्याचे समजल्यावर लिहिले होते की, हे खूप वाईट वृत्त आहे. दिशाच्या कुटुंब व मित्रांसोबत माझ्या संवेदना आहेत. देव तिच्या आत्म्यास शांती देवो.
प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुंबईतील त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तो 34 वर्षांचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. त्याच्या रुमचा दरवाजा जेव्हा तोडला तेव्हा सुशांतने गळफास घेतला होता. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, तो गेल्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता.
सुशांतने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता. ‘काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते.
या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’,सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.