'सुशांतचे अंत्यसंस्कार होते बर्थडे पार्टी नाही...', संदीप सिंगने रियावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 05:35 PM2020-09-10T17:35:00+5:302020-09-10T17:40:04+5:30

संदीप सिंगने नुकतेच मीडियाशी बोलताना रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे.

'Sushant's funeral was a birthday party, not a party ...', Sandeep Singh targets Riya | 'सुशांतचे अंत्यसंस्कार होते बर्थडे पार्टी नाही...', संदीप सिंगने रियावर साधला निशाणा

'सुशांतचे अंत्यसंस्कार होते बर्थडे पार्टी नाही...', संदीप सिंगने रियावर साधला निशाणा

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात निर्माते संदीप सिंगचेदेखील नाव जोडले गेले आहे. संदीप सिंग स्वतःला सुशांतचा मित्र सांगतो. पण मीडियामधील वेगवेगळ्या विधानामुळे त्याच्यावर संशय घेण्यात आला होता. सीबीआयने संदीप सिंगचीदेखील चौकशी केली. बराच काळ मीडियापासून लांब असलेला संदीप सिंग आता मीडियासमोर येऊन स्टेटमेंट देतो आहे.

एबीपी लाइव्हच्या रिपोर्टनुसार, संदीप सिंगने नुकतेच न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, रिया चक्रवर्तीला सुशांतच्या निधनाच्या आधी ओळखत नव्हता. रिया चक्रवर्तीनेदेखील एका मुलाखतीत सांगितले होते की, संदीप सुशांतचे इतके चांगले फ्रेंड होते तर दीड वर्षांपासून कुठे होते? याचे उत्तर देत संदीप सिंगने मुलाखतीत सांगितले की, जर रियाला खरंच सुशांत सिंग राजपूतच्या अंत्य संस्कारात सहभागी व्हायचे होते तर निमंत्रणाची वाट का पाहिली? ती बर्थडे पार्टी किंवा चित्रपटाची सक्सेस पार्टी नव्हती.

'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
 

ही कोणती बर्थडे किंवा सक्सेस पार्टी नव्हती
संदीप सिंगने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जे लोक म्हणत आहेत की सुशांतच्या अंत्य संस्कारासाठी त्यांना निमंत्रण दिले नाही. त्यांनी आपल्या मेंदूची तपासणी करून घ्यावी. ही कोणती बर्थडे पार्टी किंवा मुहूर्त वा चित्रपटाची सक्सेस पार्टी नव्हती. हे अंतिम संस्कार होते. जर तुम्ही सुशांतचे फ्रेंड आहात तर त्याच्या अंतिम संस्कारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळण्याची वाट का पाहत होता? तुमचे डोकं खराब झालं आहे. तुम्ही लोक शिकलेले आहात आम्ही नाही आहोत?

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'
 

असा कसा विचार करू शकता
संदीप सिंग पुढे म्हणाला की, अंत्य संस्कारासाठी जे लोक आले नाही ते नंतर म्हणत होते की मला बोलवले नव्हते. माझे नाव यादीत नव्हते.ही काय कोणत्या मोठ्या राजकीय नेता किंवा बिझनेसमनचे लग्नाची यादी आहे की गेस्ट लिस्टमध्ये असाल तर तुम्हाला एन्ट्री मिळेल आणि तुम्हाला टिक केले जाईल? तुम्ही जाण्यासाठी तयार होतात का? मी समजू शकतो की तुम्हाला कोणती तरी सहानुभूती हवी आहे पण तुम्ही हा विचार केला नसेल. ओह माझे नाव तिथे नव्हते. हे देवा मला बोलवले नाही. असा कसा विचार करू शकतात.

VIDEO: सुशांतच्या या Unseen व्हिडीओंमुळे उडाली खळबळ; रियाचं पितळ पडलं उघडं?
 

रिया आजची रात्रही काढणार जेलमध्ये
सुशांत राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर रियाला पहिली रात्र एनसीबी लॉकअपमध्ये काढावी लागली. रियाने जामीन मागितला असला तरी त्यावेळी कोर्टाने नकार दिला. त्यानंतर रियाची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालय उद्या रिया आणि शोविकच्या जामिनावर आदेश देणार आहे.


 

Web Title: 'Sushant's funeral was a birthday party, not a party ...', Sandeep Singh targets Riya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.