Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:35 AM2023-03-04T11:35:06+5:302023-03-04T11:44:43+5:30

Shraddha Kapoor : श्रद्धाने वाढदिवसाच्या दिवशी वडापावचा मनसोक्त आस्वाद घेतला.

Video Shraddha Kapoor Meets Fans, Eats Vada Pav With Paps As She Celebrates Her Birthday | Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

Shraddha Kapoor : Video - कडक! श्रद्धा कपूरने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर मारला ताव; म्हणाली....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ने कालच मोठ्या उत्साहात, आनंदात तिचा वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे श्रद्धाने वाढदिवसाच्या दिवशी गरमा गरम 'वडापाव'वर ताव मारला आहे. अभिनेत्रीला वडापाव खूप आवडतो आणि याआधी देखील तिने अनेकदा वडापावबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. यामध्ये श्रद्धा वाढदिवसाच्या दिवशी वडापावचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये श्रद्धाच्या एका हातामध्ये वडापाव ठेवलेली प्लेट दिसत आहे आणि ती वडापाव खात आहे. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वडापाव कसा आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रद्धाने वडापाव खूप छान आहे. बेस्टेस्ट आहे. गरम गरम आहे असं म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याआधी देखील तिने अनेकदा वडापाव खाल्ला आहे. 

काही दिवसांपूर्वी तिने पुणे दौऱ्यात 'सेवेन वंडर्स' (Seven Wonders)लाही भेट दिली होती. त्यावेळी प्रसिद्ध आयफेल टॉवरखाली श्रद्धाने वडापावचा आस्वाद घेतला होता. श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Randbir Kapoor) आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

श्रद्धा आणि रणबीर दोघेही विविध ठिकाणी चित्रपटाच्य़ा प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी सिनेमा निर्मित केला आहे. येत्या  8 मार्च रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Video Shraddha Kapoor Meets Fans, Eats Vada Pav With Paps As She Celebrates Her Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.