विद्या बालनला एकटीला रूममध्ये घेऊन गेला दिग्दर्शक आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:22 PM2019-08-27T12:22:17+5:302019-08-27T12:23:29+5:30
विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता.
अभिनेत्री विद्या बालनची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. एका मुलाखतीत खुद्द विद्यानेच हा खुलासा केला. विद्याने अनुभवलेला एक प्रसंग इतका वाईट होता की तिने सहा महिने स्वत:चा चेहरा आरशात पाहिला नव्हता.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असतानाची ही घटना. चेन्नईत एका दिग्दर्शकाला भेटायला गेली असताना त्या दिग्दर्शकाने असे काही केले की, विद्या आजही तो प्रसंग विसरू शकलेली नाही. ताज्या मुलाखतीत विद्याने याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मला आजही आठवते. एक दिवस मी चेन्नईत एका दिग्दर्शकाला भेटायला गेले होते. मी त्याला कॉफी शॉपमध्ये बसून बोलू असे म्हणत होते. पण तो मात्र मला रूमवर येण्याचा आग्रह करत होता. अखेर मी त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये गेली. मात्र रूमचा दरवाजा उघडा ठेवला. यानंतर त्या दिग्दर्शकाने या-त्या गोष्टींवर चर्चा केली. पण माझे हावभाव आणि रूमचा उघडा दरवाजा यावरून तो समजायचे ते समजला आणि 5 मिनटांत त्याने रूममधून पळ काढला. यानंतर तो चित्रपटही मी गमावला.
स्ट्रगल काळात विद्यासोबत अशा अनेक घटना घडल्या. विद्याच्या हातात तेव्हा सुमारे 10 सिनेमे होते. मात्र अध्यार्हून जास्त सिनेमांतून तिला काढण्यात आले. चेन्नईमध्ये जेव्हा विद्याचे आई- बाबा निर्मात्यांकडे तिला सिनेमांतून काढून टाकण्याचे कारण विचारायचे तेव्हा निर्माते तिचा फोटो दाखवून, ‘ती कोणत्या अंगाने अभिनेत्री दिसते’ असा उलट प्रश्न विचारायचे.