म्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’...! ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:33 PM2020-05-29T17:33:48+5:302020-05-29T17:35:57+5:30
झायरा वसीमने अशी काही बोलली की, सगळेच हैराण झाले. परिणामी झायरा प्रचंड ट्रोल झाली.
साल 2020 अनेक संकटे घेऊन आले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या माहामारीने अख्खे जग पोळून निघले आहे. भारतातही कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. अशात टोळधाडीमुळे एक नवे कृषिसंकट भारतापुढे उभे ठाकले आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि विदर्भातील काही भागावर टोळधाडीने हल्ला केला. ही टोळधाड केवळ शेतक-यांसाठीच डोकेदुखी ठरलेली नाही तर सरकारच्या डोक्याचा तापही यामुळे वाढला आहे. सोशल मीडियावर सध्या टोळधाडीच्या बातम्या ट्रेंड करत आहेत. अशात बॉलिवूडची माजी अभिनेत्री झायरा वसीमने अशी काही बोलली की, सगळेच हैराण झाले. परिणामी झायरा प्रचंड ट्रोल झाली.
टोळधाड ही दुसरे तिसरे काही नसून ‘अल्लाह का कहर’ आहे, असे ट्विट झायराने केले. आपल्या ट्विटमध्ये तिने कुराणचे काही संदर्भही लिहिले.
तिचे हे ट्विट पाहून नेटक-यानी तिला जोरदार ट्रोल केले. लोक तिच्यावर प्रचंड संतापले.
ट्वीट करना इस्लाम में हराम है...
— Aapka Apna Sam (@SamAkhandBharat) May 27, 2020
इस्लाममध्ये तर ट्विटरचा वापरही ‘हराम’ आहे. मग ते ट्विटर का सोडत नाही, अशा शब्दांत लोकांनी तिला फैलावर घेतले. या सगळ्यानंतर झायराने काय केले तर खरोखर ट्विटर अकाऊंट डिलीट केले. तिने हे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केले की काही दिवसांसाठी हे तूर्तास माहित नाही.
This idiot Zaira Wasim shld undrstnd tht using social media will affect her relationship with her religion cause its supposedly haram to use all this technology so she shld just shut the hell up n take off somewhere where she can live with her religion n her god 🙄🙄🙄
— 🕉 𝓘𝓼𝓱𝓪 🇮🇳 (@Isha0429) May 28, 2020
अभिनेत्री झायरा वसीमने गतवर्षी बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याच्या झायराच्या या अनपेक्षित निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या़ सोशल मीडियावरही याची खूप चर्चा झाली होती.
‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’, असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.