- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या साहाय्याने २५ टक्के बेड्सवर ऑक्सिजनची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास तिचा मुकाबला करताना आरोग्य सुविधांची कमतरता पडणार नाही, याची खरबरदारी घेत आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सज्जता वाढवत आहे. ऑक्सिजन प्लांट, अैाषधी, परामेडीकल स्टाफ याचा सर्वंकष आढावा शुक्रवारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर उपरोक्त बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात दुर्दैवाने तिसरी लाट जर आली तर किती व्यक्ती कोरोनाबाधित होऊ शकतात, लहान मुलांचे प्रमाण किती राहील या दृष्टीनेही आरोग्य यंत्रणा सध्या सर्वेक्षण करून त्यासंदर्भातील अंदाज २ जुलैला सादर करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सांगितले.
तीन ठिकाणी प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेडबुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५० बेडवर ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १५ या प्रमाणे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली जात आहे. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ३० बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.
१६ ऑक्सिनज प्लांटदुसऱ्या लाटेत आलेल्या आरोग्य विषयक समस्या पाहता आता जिल्ह्यात आठ शासकीय व आठ खासगी असे एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत. प्रतिदिन १७ मेट्रिक टन एवढी महत्तम क्षमता विचारात घेऊन त्यांची निर्मिती केली गेली आहे. या व्यतिरिक्त समर्पित कोविड रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांटद्वारे ८० टक्के ऑक्सिजन, तर पीएसए प्लांटद्वारे एकूण आवश्यकतेच्या २० टक्के ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे यंत्रणेचे नियोजन झाले आहे. सध्या जिल्ह्यात २६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध असून, सीएसआर फंडातून आणखी २०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध करण्यात येत आहेत.