लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हंगाम २0१७-१८ मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार उडीद व मूग शे तमालाची खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेकरिता ३ ऑक्टोबरपासून शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेगाव, चिखली, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, लोणार, मेहकर, संग्रामपूर, सिंदखेड राजा व दे.राजा असे १0 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात चिखली येथे तालुका जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्था व उर्वरित ठिकाणी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थांमार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी तसेच त्यानंतरची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.उडीद-मूग उत्पादक शेतकर्यांनी विक्री करावयाचे मुग, उडीद शेतमालाचे वजन, ७/१२ उतारा, चालू वर्षाचा मूग-उडीद पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुकचे प्रथम पानाची छायांकित प्रत व मोबाइल क्रमांक नोंदणी करतेवेळी सादर करावे, कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण कागदपत्रावर नोंदणी ऑनलाइन होणार नाही. नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळी खरेदी सुरू होईल, त्यावेळी शेतकर्यांना खरेदीसाठी त्यांचा शे तमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणणेबाबत नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. उडीद व मूग उत्पादक शेतकर्यांनी शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करणेसाठी त्यांच्या नावाची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उडीद, मूग खरेदीसाठी जिल्हय़ात १0 केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:16 AM
बुलडाणा: हंगाम २0१७-१८ मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार उडीद व मूग शे तमालाची खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेकरिता ३ ऑक्टोबरपासून शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेगाव, चिखली, बुलडाणा, खामगाव, मलकापूर, लोणार, मेहकर, संग्रामपूर, सिंदखेड राजा व दे.राजा असे १0 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देआजपासून शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणीनाफेडच्यावतीने शासनाच्या हमीभावानुसार खरेदीतालुका खरेदी-विक्री संघ, चिखली येथे जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेमार्फत ऑनलाइन नोंदणी