शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

१० लिटरचा उपक्रम ३१ वर्षांत पोहोचला ८०० लिटरवर

By admin | Published: May 24, 2017 7:47 PM

खामगाव : येथील मानकुंवरबेन लालचंदजी दोशी सार्वजनिक छांच वितरण या सेवाभावी संस्थेकडून सुमारे ८०० कुटुंबीयांना उन्हाळाभर ताकाचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

गिरीश राऊतलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : असह्य होणाऱ्या उन्हाळ्यात आवश्यक वाटणाऱ्या व शरीराला "अमृत" ठरणाऱ्या ताकाचे मोफत वाटप येथील मानकुंवरबेन लालचंदजी दोशी सार्वजनिक छांच वितरण या सेवाभावी संस्थेकडून सुमारे ८०० कुटुंबीयांना उन्हाळाभर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गत १९७६ साली हा उपक्रम सुरु करताना १० लिटर ताकाचे वाटप दरदिवशी करण्यात येत होते. मात्र गेल्या ३१ वर्षांत यामध्ये लाभार्थींच्या संख्येत वाढ झाल्याने हा आकडा आता ८०० लिटरवर पोहोचला आहे. शहरातील रहिवासी मानकुंवरबेन लालचंदजी दोशी ह्या मध्य प्रदेशातील इंदोर येथे उन्हाळ्यात काही कामानिमित्त गेल्या असता तेथे मोफत ताक वाटपाचा उपक्रम राबविल्या जात असल्याचे त्यांना दिसून आले. याच प्रेरणेतून त्यांनी हा उपक्रम खामगाव येथे सुरु करण्याचे ठरविले व आपल्या परिने सुरुवातीला दररोज १० लिटर ताकाचे मोफत वितरण त्यांनी सन १९७६ साली सुरु केले होते. यानंतर या उपक्रमाचे महत्व पाहता शहरातील इतर दानदाते सुध्दा या उपक्रमाशी जोडले गेले. आजरोजी या उपक्रमाला अखंडित ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. दुधाची टंचाई पाहता ताक वाटपात खंड पडू नये यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून नामांकित कंपनीची दूध पावडर आणण्यात येवून दही लावल्या जाते व त्यानंतर ताक तयार करण्यात येते. उन्हाळ्यात वाढते तापमानात शरीराला ताकाची आवश्यकता असताना अशांसाठी हे मोफत ताक ह्यअमृतह्ण समान ठरत आहे. आजरोजी मोफत ताक वितरणासाठी ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष महेंद्रभाई शहा, उपाध्यक्ष प्रफुल्लभाई कमानी, सचिव हसमुखभाई कमानी, कोषाध्यक्ष भिकुभाई संघराजका, सदस्य सर्वश्री नगीनभाई मेहता, जगदिशभाई संघराजका, अशोक कमानी, किर्तीभाई खिलोशिया, कपिलभाई दोशी, रतनलाल सुराणा, अ‍ॅड.व्हि.वाय.देशमुख आदींसोबतच नामदेवराव माने हे परिश्रम घेत आहेत. कायमस्वरुपी व्यवस्था३१ वर्षांपासून सुरु असलेला हा उपक्रम अखंडितपणे सुरु राहावा, यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था म्हणून दानदात्यांकडून प्राप्त झालेला मदतनिधी बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात आला आहे. यावर मिळणाऱ्या व्याजातून हा खर्च भागविल्या जातो. मात्र दरवर्षी लाभार्थी संख्या वाढतीच आहे. सर्वधर्मीयांना मिळतो लाभमोफत ताकाचे वितरण करताना कोणताही भेद या मंडळाकडून केला जात नाही. यामुळेच सर्वधर्मीय नागरिक या मोफत ताकाचा लाभ घेतात. दरवर्षी लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळेच आजरोजी लाभ घेणाऱ्या कुटुंबांची संख्या ८०० चे जवळपास पोहोचली असून दररोज ८०० लिटर ताकाचे वाटप मोफत केल्या जाते. योग्य वितरणासाठी काळजीहा मोफत ताक वाटपाचा उपक्रम गेल्या ३१ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. प्रत्येकाला गरजेपुरते दिले तर ताकाचा वापर होतो व फेकण्यात जात नाही. तसेच हेच ताक गरजवंतांना कामी येते. त्यामुळे मोफत ताकाचे लाभार्थी ठरविताना शिधापत्रिकेवर नमूद असलेल्या कुटुंब संख्येप्रमाणे प्रति व्यक्ती २५० मिली याप्रमाणे मोफत ताक देण्यात येते. तसेच दररोज ताक दिल्यानंतर कार्डवर पंचिंग सुध्दा करण्यात येते. पदाधिकाऱ्यांची स्वत: हजेरी व श्रमदानमोफत ताक लाभार्थींची संख्या आजरोजी ८०० वर पोहोचली आहे. येथे ताजे ताक वितरण करण्यात येते. लाभार्थी सकाळीच ताकासाठी येत असल्याने सदर वाटप सकाळी ५.३० वाजता सुरु होवून तास दीड तासात पूर्ण होते. त्यामुळे एकाचवेळी होणारी गर्दी पाहता विलंब तसेच गोंधळ होवू नये यासाठी या ट्रस्टचे सर्वच पदाधिकारी स्वत: हजर राहून ताक वाटप, कार्ड पंचिंग, रांगा लावणे आदी कामे स्वत: करतात. विशेष म्हणजे सर्वच पदाधिकारी हे उद्योजक व व्यावसायिक असून सामाजिक सदभाव म्हणून या उपक्रमात तन, मन, धनाने समाधान म्हणून आपली सेवा देत आहेत.