ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. २४- स्त्री- पुरुष प्रमाण समान ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ह्यबेटी बचाओह्णसारखे अभियान राबविण्यात येते; परंतू जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून ९२८ वरच अडकले आहे. यावर्षीसुद्धा जिल्ह्यात दरहजार मुलांमागे जवळपास ९0५ मुलींच्या जन्माचे प्रमाण असून, मुला-मुलींच्या या प्रमाणात दरवर्षी १0 टक्के तफावत कायम दिसून येत आहे.स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान ठेवण्याकरिता ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण मोहीम देशभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातसुद्धा गेल्या दोन वर्षांपासून स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. स्त्री-पुरुष प्रमाण समान आढळून येणार्या खेड्याला लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशा घोषणाही शासन स्तरावरून करण्यात आल्या होत्या. लिंग विषमता दिसून येणार्या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्येची मानसिकता मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग व समाजातील श्रीमंत वर्गात रुजली आहे. मात्र, आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाणात तफावत आढळून येते. बुलडाणा जिल्ह्यातही दरहजार मुलांमागे जवळपास ९0५ मुलींच्या जन्माचे प्रमाण यावर्षी असून, मुला-मुलींच्या या प्रमाणात दरवर्षी १0 टक्के तफावत दिसून येत आहे. सन २0१४ पासून सन २0१६ पर्यंत मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९२८ वरच थांबले आहे. बुलडाणा तालुक्यात मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २0१४-१५ मध्ये ९८२ व २0१५-१६ मध्ये ९४९, चिखली तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८६८ व २0१५-१६ मध्ये ९५४, देऊळगाव राजा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९३३ व २0१५-१६ मध्ये ९६६, जळगाव जामोद तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८८१ व २0१५-१६ मध्ये ८३९, खामगाव तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९७२ व २0१५-१६ मध्ये ९७९, लोणार तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८५९ व २0१५-१६ मध्ये ८३८, मलकापूर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९१५ व २0१५-१६ मध्ये ९२९, मेहकर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८७६ व २0१५-१६ मध्ये ८५२, मोताळा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९६६ व २0१५-१६ मध्ये ८७८, नांदुरा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये १0३१ व २0१५-१६ मध्ये ८४३, संग्रामपूर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८८५ व २0१५-१६ मध्ये ८८६, शेगाव तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८६६ व २0१५-१६ मध्ये ८८४, सिंदखेड राजा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८७५ व २0१५-१६ मध्ये ८६५ मुला-मुलींच्या जन्मांचे प्रमाण आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध कायदा असला तरी त्याचे निर्मूलन होण्यासाठी सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीचे मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९0५! एप्रिल २0१६ ते ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९0५ आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ९0६, चिखली ९१0, देऊळगाव राजा ८८९, जळगाव जामोद ९६१, खामगाव ९0९, लोणार ९२९, मलकापूर ९३९, मेहकर ९१५, मोताळा ८९६, नांदुरा ७२७, संग्रामपूर ८७0, शेगाव ८८१ व सिंदखेड राजा तालुक्यात ८८२ असे मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण आहे.
मुला-मुलींच्या प्रमाणात १0 टक्के तफावत!
By admin | Published: December 25, 2016 2:35 AM