लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील १८१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त बुलडाणा तालुक्यातील ३९ तर सर्वात कमी संग्रामपूर तालुक्यातील ६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात ३० हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३० हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २८ हजार ९६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४५७७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १४ १८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९७९९ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ४११ विद्यार्थी पास ग्रेसमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. खामगाव तालुक्यातील १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, नांदुरा तालुक्यातील ८, संग्रामपूर तालुक्यातील ६, मलकापूर तालुक्यातील ७, बुलडाणा तालुक्यातील सर्वात जास्त ३९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच चिखली तालुक्यातील २७, मेहकर तालुक्यातील १३, लोणार तालुक्यातील १२, शेगाव तालुक्यातील १२, जळगाव जामोद तालुक्यातीाल १३, सिंदखेड राजा तालुक्यातील १८, देऊळगाव राजा तालुक्यातील ४ तसेच मोताळा तालुक्यातील १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.यावर्षी बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांना कोरोनामुळे दबावाखाली द्यावी लागली. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्क लावून बसविण्यात आले. यावर्षी बारावीचा निकाल लागला असला तरी पुढील प्रवेशप्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. महाविद्यालयांमध्ये सत्र केव्हा सुरू होणार याविषयी कोरोनामुळे गोंधळाचे वातावरण आहे.साडेचार हजार विद्यार्थी प्राविण्य श्रेणीतजिल्ह्यात परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी ४५७७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर केवळ ४११ विद्यार्थी पास ग्रेसमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात एकूण २८ हजार ९६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १४१८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९७९९ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात १८१ शाळांचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:46 AM