पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १०४, खामगावमध्ये ९८, शेगावात ४५, देऊळगावराजा ११२, चिखली २४, मेहकर ८८, मलकापूर १३५, नांदुरा ५१, लोणार १७९, मोताळा ११२, जळगाव जामोद ९६, सिंदखेड राजा १७१, संग्रामपूर तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. यासोबतच अकोला जिल्ह्यातील लोहारा येथील ३, आलेवाडी १, राळेगाव १, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एक, जालना जिल्ह्यातील भारज येथील एक जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर बुलडाणा जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ७० वर्षीय महिला, नांदुरा तालुक्यातील पोटळी येथील ८३ वर्षीय पुरुष, किनगाव राजा येथील ४५ वर्षीय महिला, मलकापुरमधील मधुमालती नगरमधील ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
--३,५५,९५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह--
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी ३ लाख ५५ हजार ९५९ जणांचे अहवाल आजपर्यंत निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ५५ हजार ६०१ संदिग्धांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी ४,९६१ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६३ हजार ८८९ झाली असून यापैकी ६ हजार ८७८ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४१० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.